ईतर

माहूर येथील ‘महात्मा ज्योतिबा फुले सह. गृहनिर्माण संस्थेची जागा परस्पर इतराच्या नावावर..? ; बनली टोलेजंग इमारत…?

"फेरफारासाठी मोठा व्यवहार झाल्याचा संशय ; बेकायदेशीर फेरफार रद्द करण्याची मागणी..!"

माहूर/प्रतिनिधी
माहूर येथील महात्मा ज्योतिबा फुले सहकारी गृहनिर्माण संस्थेची जागा कुठल्याही प्रकारे खरेदी-विक्री सौदे पत्र किंवा मुद्रांक लिहून दिले नसताना परस्पर एकाच्या नावे करण्याचा प्रताप प्रशासनाने केला असून या व्यवहारासाठी मोठा आर्थीक व्यवहार झाल्याचा आरोप करून हा बेकायदेशीर फेर रद्द करण्याची मागणी संस्थेचे अध्यक्ष निरधारी जाधव यांनी महसूल मंत्र्यांसह संबंधितांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
   महात्मा ज्योतिबा फुले सहकारी गृहनिर्माण संस्थेची माहूर शहरात गट क्रमांक १९५ मध्ये मालकी व ताब्यातील जागा आहे. त्या पैकी काल्पनिक खाते क्रमांक १०८१ अर्पणा अतुल कडु नामक व्यक्ती क्षेत्र ०.०३.०० यांंच्या नावे फेरफार क्र. २१९२ नुसार फेरफार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करून संबंधितांवर कार्यवाहीचीही मागणी केली आहे..
   विशेष म्हणजे संस्थेमार्फत तत्कालीन अध्यक्ष किंवा विद्यमान अध्यक्षांनी कुठल्याही प्रकारे खरेदी-विक्री खत, सौदे पत्र किंवा मुद्रांकावर लिहून दिले नसताना संबंधित फेरफार क्र. २१९२ हा फेरफार झालाच कसा?  ही अनाकलनीय बाब बनली असून फेर झालेली सदर व्यक्ती संस्थेची सभासद देखील नाही. अशा परिस्थितीत संबंधितांकडून मोठ्या आर्थिक वाटाघाटीअंती जागेचा फेर केला असल्याचा आरोपही जाधव यांनी केला आहे..
 दरम्यान संस्थेचे विद्यमान अध्यक्ष निरधारी ज्ञानेश्वर जाधव यांनी सदरची जागा ही छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसेच महात्मा ज्योतिबा फुले नगर परिसरातील नागरिकांसाठी उद्यानाकरीता आरक्षित क्षेत्र असल्याचे सांगितले असून ७/१२ वर बेकायदेशीरपणे झालेली नोंद रद्द करून संबंधितांवर कार्यवाहीची मागणी केली आहे. निवेदिनाच्या प्रती महसूल मंत्री, विभागीय आयुक्त पासून ते तलाठी पर्यंत देण्यात आल्या आहेत…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close