सामाजिक

वाई बाजार येथे विविध ठिकाणी ७५वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..!

'कडाक्याच्या थंडीतही चिमुकल्यांची उपस्थिती लक्षणीय ; ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त सहभाग..!

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

वाई बाजार येथे विविध प्रजासत्ताक दिन उल्हासात साजरा करण्यात आला असून येथील ग्राम पंचायत कार्यालयासह आदिवासी सेवा सहकारी सोसायटी तसेच विविध शैक्षणिक संस्थांत शालेय विद्यार्थ्यांच्या लक्षणीय उपस्थितीत भारतीय प्रजासत्ताक दिन हर्षोल्हासात साजरा करण्यात आला..

 ★   ७५ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमिवर येथील जि.प. केंद्रीय प्रा. शाळेसह कै. पार्वतीबाई मा.व उ.मा. विद्यालय तसेच वसंतराव नाईक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ग्राम पंचायत कार्यालयात सरपंच सिताराम दामा मडावी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले यावेळी उपसरपंच हाजी उस्मान खान पठाण यांच्यासह सर्व ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती होती…

येथील हनुुुुमानमंदीर चौकातील सार्वजनिक झेंड्याचे ध्वजारोहन जेष्ठ नागरिक तथा उत्कृष्ठ शेतकरी व सर्वांचे मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून प्रचलित असलेले दत्तात्र्यय भुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील सर्व शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती..

  ★ वाई बाजार येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक व गावातील प्रतिष्ठीतांच्या प्रमुख  उपस्थितीत मु्ख्याध्यापक  डि. बी. शिंदे यांच्या हस्ते हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी सरपंच सिताराम मडावी यांच्यासह ग्रा.पं. सदस्या पार्वतीबाई शंकरराव बेहेरे,  शितल शिंदे, प्रकाश खडसे, फिरोज खान पठाण, महिला पोलीस पाटील सौ. आशा बळीराम मोरे, आदी प्रतिष्ठितांसह शाळेतील शिक्षक बंडू ईश्वरकर, रोहीदास जाधव, सुशिल गावंडे, उमेश डाखोरे, हन्नानपाशा अब्दुल अजिज बरोटे,  मुनेश्वर थोरात, किशोर कांबळे, शिक्षिका रूपाली आरेकर, प्राजक्ता लांडे, जोत्सना केशवे व गिता कुमरे यांची उपस्थित होती..

 ★ कै. पार्वतीबाई मा. व उ.मा. विद्यालयात माहूर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. अनुसयाबाई आंबादास राजूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आंबादास राजूरकर यांच्यासह वाई बाजारचे उपसरपंच हाजी उस्मान खान पठान, सचिव सचिन राजूरकर, अनुप गेंटलवार, प्रकाश कन्नलवार, अमजद पठाण, तसेच शाळेचे मुख्याध्यापक व्ही.आर. राठोड यांच्यासह एस.एस.चव्हाण, बी.डी. सलाम, जि.बी. राठोड, जी.यू. वट्टमवार, एस.जी. मगरे, जे.डी. पडलवार, के.ए. देवकर, एस.व्ही. कन्नलवार, बि.एस. गोकनवार, ए.जी. सुरोसे, एम.के. नागपुरे आदींची उपस्थिती होती…

सुभद्राबाई केशवे इंग्लिश मीडियम स्कूल येथे बंडोपंत गेंटलवार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी आतिष गेंटलवार, रमेश जाधव, सागर कन्नलवार, शैलेश पारधे, अरविंद पवार, गजानन ठमके, अंकुश राठोड, प्रफुल्ल चव्हाण, तुषार राठोड, प्रफुल राठोड, विशाल टोके तसेच शाळेचे मुख्याध्यापक ए.पी. कंधारे, डाखोरे सर, नाळे सर, प्रियंका गोपने, प्रजापती थोरात, बेहेरे मँडम, टनमने मँडम, गावंडे मँडम, दळवे मँडम यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीमती ठमके, श्रीमती नमुलवार, विशाल पारधे, स्वप्नील सलाम व अंकुश टनमने आदींची उपस्थिती होती…

रायझिंग रोज इंग्लिश स्कूल मध्येही भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सौ. क्षमा मुनगीलवार यांच्यासह मेघा पिल्लेवार, छाया कल्याणकर, दीपाली कडुकर, प्रिया गावंडे, दीपाली कटकमवार, मनीषा गंजेवाड, अश्विनी राजूरकर, राधा पिल्लेवार, राधिका राकेश, द्रौपदी  धोंगडे, आयेशा खान, मुस्कान खान,समीक्षा शिवणीतवार, मोनिका वाघमारे व अतिष काळे यांची उपस्थिती होती…

रतनीबाई इंग्लिश स्कूल येथे प्रमुख मान्यवर राजूसिंग राठोड यांच्यासह विजय राठोड, अनिल पवार, निरज कंधारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे संचालक सुजित विलास राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सौ. बी.व्ही. राठोड यांचासह सोनिया जैस्वाल, अपुर्वा येरावार, दिक्षा खडसे, योगिता दालपे, सपना ताटेवार, ऋतुजा ताटेवार, अमोल राठेड, अनिता कंठेश्वर, प्रगती कंठेश्वर, स्नेहा रामटेके तसेच अनेक ग्रामस्थांची उपस्थिती होती. 

विशेषत: एकेकाळी अत्यंत नावारूपास असलेली वसंतराव नाईक विद्यालयाला आज “दैवाने दिले..पण कर्माने नेले” चा इंत्तभुत प्रत्यय आला… दरम्यान दांडीबहाद्दरांच्या कर्माने कमी झालेली विद्यार्थीसंख्या जाहीर होवू नये किंबहूंना यासाठीच येथील ध्वजारोहण समारंभाचे आमंत्रण गावक-यांना देण्यात आले नसल्याची ओरड ग्रामस्थांकडून ऐकावयास मिळाली.. तर अगदी दोघा-तिघांना भ्रमणध्वनीवरून कॉल करून बोलावले असल्याचेही कळते.. दरम्यान पत्रकार सुभाष खडसे, प्रदीप टोके तसेच मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी व काही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत येथील ध्वजारोहन सकाळी साडेसात वाजता पार पडले.. व प्रथेप्रमाणे सेवकांना ध्वजरक्षणासाठी ठेवून शिक्षक कर्मचारी ज्यांच्या त्यांच्या गावाकडे रवाना झाले.. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close