Games

माहूर येथील ‘मॉडर्न इंग्लिश स्कूल’ च्या वार्षिक क्रिडा महोत्सवाचे थाटात उदघाटन..

'शैक्षणिक उपक्रमांसह विविध कार्याचीही दिली माहिती..!'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

श्रीक्षेत्र माहूर/जयंत गिऱ्हे
   माहूर शहरातील ‘मॉडर्न इंग्लिश स्कूल’ च्या वार्षिक क्रीड़ा महोत्सवास दि. १९ जानेवारी रोजी सुरुवात झाली असून यावेळी संस्थेतर्फे दिल्या जाणा-या उत्कृष्ठ शैक्षणिक उपक्रमांसह वर्षभर राबवण्यात येणा-या उपक्रमांची माहिती देण्यात आली.
  या  क्रिडा महोत्सवाचे उदघाटन श्री रेणुका महाविद्यालय माहुरचे क्रिड़ाप्रमुख धरमसिंग जाधव व माहुर तालुका क्रीड़ा समितीचे सदस्य चे सुरेश गिऱ्हे तसेच वडसा येथील राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू कृष्णा राठोड यांच्या हस्ते करण्यात आले..  यावेळी संस्थेचे प्राचार्य अजीज खान यांनी पाहुण्यांचे स्वागत विध्यार्थ्यांच्या संचलनाने करून उपस्थित पाहूण्यांचा सत्कार केला. तर संस्थेतर्फे उत्कृष्ट शिक्षणासह वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली..

 

  दरम्यान क्रीडा महोत्सवामुळे विद्यार्थी वर्गात खेळांविषयी जागरूकता निर्माण व्हावी व ग्रामीण भागातील खेळाडू देश व राज्य पातळीवर खेळावे.. अशी प्रतिक्रिया खेळाडू / प्रशिक्षक तथा क्रीडा समिती सदस्य सुरेश गिऱ्हे यांनी दिली.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भिसे मॅडम यांनी केले. यावेळी यावेळी विध्यार्थी, शिक्षक वर्ग, कर्मचारी उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close