सामाजिक
धार्मिक कार्यक्रम पार पाडताना एकमेकांतील वैरभाव दुर ठेवावा – सपोनि. सुशांत किनगे
मराठा आरक्षण व राम मुर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभुमिवर वाई बाजार येथे शांतता कमेटीची बैठक संपन्न...
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
वाई बाजार/प्रतिनिधी
मराठा आरक्षण व राम मुर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभुमिवर वाई बाजार येथे शांतता कमेटीची बैठक आज (दि.२१) रोजी संपन्न झाली असून कोणताही धार्मिक उत्सव पार पाडत असताना सामाजिक परिस्थितीचे भान राखून एकमेकांतील वैरभाव दुर ठेवण्याचे आवाहन सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे यांनी येथील शांतता कमेटीच्या बैठकीत केले.
सध्या महाराष्ट्र राज्यात तापत असलेली मराठा आरक्षणाची मागणी तेवत असतानाच आयोध्येतील राम मंदिरात राम मुर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम प्रस्तावित आहे.. तथापि राम मुर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी धार्मिक सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले असून वाई बाजार येथेही उद्या दि. २२ रोजी यासंदर्भातील कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.. त्या पार्श्वभुमिवर सिंदखेड पोलीस ठाण्याच्या वतीने आज दि. २१ जानेवारी रोजी वाई बाजार येथील ग्राम पंचायत कार्यालयात शांतता कमेटीची बैठक आयोजित करण्यात आली होती.. सरपंच सिताराम दामा मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीला सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे यांनी मार्गदर्शन करताना नागरीकांसह रामभक्तांना शांतता राखण्याचे आवाहन करताना समाजकंटकांना सावधानतेचा इशाराही दिला.. दरम्यान सामाजिक व धार्मिक कार्यक्रम पार पाडत असताना आपसातील मतभेद व वैरभाव बाजूला ठेवून पारंपारिक पद्धतीने सणोत्सव पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले… तर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यावर कार्यवाहीसाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर आणि सक्षम असल्याचा सावधानतेचा इशारा यावेळी किनगे यांनी दिला… यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष कैलाश बेहेरे यांनीही आपले मत मांडले..
यावेळी वाई बाजारचे सरपंच सिताराम दामा मडावी यांच्यासह तंटामुक्ती अध्यक्ष कैलाश बेहेरे, ग्रा. पं. सदस्य प्रकाश खडसे, फिरोजखान पठाण, माजी उपसरपंच आंबादास राजूरकर, माजी ग्रा.पं. सदस्य उदय नाईक, प्रभाकर सलाम, अजय लुटे, आकाश सातव, राजू शिंदे, गुडू सय्यद, संतोष कर्णेवार, बालाजी बेहेरे, इसूब शेख तसेच पत्रकार साजीद खान यांच्यासह अरूण पवार व वाई बीटचे पो.हे.काँ. कुमरे यांची उपस्थिती होती.