वाई बाजार येथे ‘जय स्केटिंग क्लब’ चा शुभारंभ….
(Bk महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
वाई बाजार, अमजद पठाण
आज दिनांक 29 एप्रिल शुक्रवार रोजी माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील बिरसा मुंडा चौक या ठिकाणी बिरसा मुंडा फलकाचे पूजन करून जय स्केटिंग क्लब क्लासेसचे उद्घाटन वाई गावातील प्रतिष्ठित, माजी उपसरपंच तथा माजी सभापती पंचायत समिती माहूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे शारीरिक कसरत कमालीची कमी झालू असून त्यामुळे मानसिक तणावात वाढ होत आहे. या विद्यार्थ्यांना मोबाईलच्या बाहेर काढून कसरतीबरोबरच मनोरंजनाच्या वाटेवर आणण्यासाठी माहूर येथील ‘जय स्केटिंग क्लब’ चे प्रशिक्षक वैभव सरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायाम मिळावा व मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होणाऱ्या दुष्परिणामावर मात करण्यासाठी “जय स्केटिंग क्लब व कोचिंग क्लासेस” वाई बाजार येथे सुरु केले असून
पालकांनी आपल्या पाल्यांना या कोर्ससाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन केले आहे. यावेळी या स्टेटींग क्लासेस चे औपचारिक उद्घाटन वाई बाजारचे माजी उपसरपंच हाजी उस्मान खान पठाण यांनी केले. यावेळी पत्रकार ए. एच. पठाण यांच्यासह वैभव सर, आकाश सर तसेच विद्यार्थ्यांची उपस्थित होती. तर वाई बाजार येथे स्केटिंग क्लासेस सुरू करण्यासाठी अनाथ पिंडिक कंधारे सरांनी परिश्रम घेतले…..