ईतर

अवैध व्यवसाय तात्काळ बंद करा….

प्रणिता ताई देवरे चिखलीकर यांची मागणी

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

श्रीक्षेत्र माहूर,प्रतिनिधी

तीर्थक्षेत्र माहूर शहर हे पवित्र देवस्थानचे ठिकाण असून या शहरात भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी दर्शणार्थ येतात त्यांना उघड्यावरील मास विक्री मटका जुगार अड्डे तथा अवैध व्यवसाय दिसत असल्याने त्यांची मानसिक खच्चीकरण होते त्यामुळे अवैध व्यवसाय तात्काळ बंद करण्याची मागणी प्रणिताताई देवरे चिखलीकर यांचे सह भाजपाच्या पदाधिकारी महिलांनी माहूरच्या पोलीस ठाण्यात दिनांक सहा रोजी निवेदन देऊन केली आहे…

 

माहूर शहरात श्री रेणुका देवी संस्थान श्री दत्त शिखर संस्थान तसेच इतर सर्व धर्मीयांचे देवस्थाने असल्याने येथे दररोज हजारोच्या संख्येने तर यात्रा काळात लाखोच्या संख्येने भाविक येतात या भाविकांना घाट चढताच उघड्यावरील मास विक्री तसेच चक्रीवादळ नावाचा जुगार व इतर अवैध व्यवसाय वाहनातून जाताना नजरेस पडतात त्यामुळे अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली असतानाही पोलिसांकडून या अवैध व्यवसायावर अंकुश ठेवण्यात येत नाही त्यामुळे माहूर शहरासह तालुक्यात चे सामाजिक स्वास्थ बिघडत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला..

 

     “यावेळी भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष वर्षाताई भोसले यांनी सदरील अवैध व्यवसाय तीन दिवसात बंद न केल्यास सदरील माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे समोर कथन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले..

 

यावेळी भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष वर्षाताई भोसले यांचे सह प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता ताई देवरे, चिखलीकर मराठवाडा प्रदेश सरचिटणीस रेखाताई हाके, महामंत्री देविका मिश्रा, प्रदेश कार्यकारीणी सदस्या तथा हिंगोली लोकसभा समन्वयक सौ. पद्माताई जयंत गि-हे,  जिल्हा उपाध्यक्ष यांचे सह भाजपाच्या शेकडो महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close