क्राइम
वाई बाजार फाट्यावर भिषण अपघात ; अज्ञात वाहनाच्या धडकेत अपंग भिकारी जागीच ठार…
"रात्री सव्वाआठची घटना ; अंधाराचा फायदा घेवून वाहन झाले पसार..?"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
वाई बाजार येथील फाट्यावर आज रात्री सायंकाळच्या सुमारास गडलेल्या भिषण अपघात भिका-याचा जागीच मृत्यू झाला असून धडक दिलेले वाहन रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाल्याने सदर वाहनास शोधण्याचे सिंदखेड पोलीसांसमोर मोठे आव्हान बनले आहे…
माहूर तालुक्यातील मौजे वाई बाजार येथील जुन्या बसस्थानकावर तानबा गवळी वय ७५ वर्षे रा. पंगडी ता. घाटंजी जि. यवतमाळ हा अपंग इसम मागील १० ते १२ वर्षांपासून भिक्षा मागण्याचे काम करत होता.. सदर इसमाचे दोन्ही पाय निकामी असल्याने तो सरपटणा-या गाड्यावर बसूनच ये-जा करत तथा भिक्षा मागून आपले जिवनमान जगत होता. दरम्यान आज दि. ५ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास येथील फाट्यावर मुख्य महामार्गाच्या एका बाजूकडून दुस-या बाजूकडे जात असताना माहूर कडून सारखणीकडे जात असलेल्या एका चारचाकी अज्ञात वाहनाने त्यास जोराची धडक दिली. त्यात त्याचे दोन्ही पाय व दोन्ही हात तुटल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे..
यावेळी अंधाराचा फायदा घेत धडक दिलेले वाहन पसार झाले. त्यामुळे सिंदखेड पोलीसांसमोर त्या वाहणास शोधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे..
दरम्यान घटनेची माहिती मिळताच सिंदखेड पोलीसांसह वाई बाजारच्या महिला पोलीस पाटील सौ. आशा बळीराम मोरे यांनी गटनास्थळावर हजर होवून मयताच्या शवविच्छेदनासाठी प्रेतास वाई बाजारच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे नेले… याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न झाल्याने याबाबतची अधिक माहिती प्राप्त होवी शकली नाही…


