सामाजिक

जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांनी मानधन योजनेसाठी आधार कार्ड व मोबाईल नंबर सादर करावेत..

जिल्हा समाज कल्याण कार्यालयाचे आवाहन

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

नांदेड/(जिमाका) दि. 6

महाराष्ट्र राज्यातील राजर्षी शाहू मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन 1954-55 पासून संपूर्ण राज्यात सांस्कृतिक संचालनालयामार्फत राबविली जाते. शासनाने सदर योजना डीबीटी मार्फत राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व वृध्द कलावंताची आपले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक गुरूवार 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सदर पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालयाकडे सादर करावीत. जिल्हयातील सर्व वृध्द कलावंतानी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील राजर्षी शाहू मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन 1954-55 पासून संपूर्ण राज्यात सांस्कृतिक संचालनालयामार्फत राबविली जाते. शासनाने सदर योजना डीबीटी मार्फत राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने संचालक सांस्कृतीक कार्य संचालनालय मुंबई यांनी केलेल्या सुचनेनुसार डीबीटी DBT (Direct Benifishri Transfer) मार्फत योजना राबविण्यासाठी सर्व वृध्द कलावंताचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक प्राप्त करुन घेण्याविषयी सुचना केली आहे.

 

 

जिल्ह्यातील सर्व वृध्द कलावंताची आपले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक गुरूवार 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सदर पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर करावीत. पंचायत समितीने सदर माहिती गुगल शीट Google Sheet मध्ये मंगळवार 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत समाज कल्याण विभागाकडे सादर करावेत. जे कलावंत आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक सादर करणार नाहीत त्यांच्या बँक खात्यावर मानधन जमा होणार नसल्याबाबत सुचना आहेत, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close