सामाजिक
वाई बाजार येथील आदिवासी भावंडाचा न्यायासाठी आमरण उपोषणाचा इशारा…
"वडिलांच्या मृत्यूने फेरफार न होवू शकलेल्या जमीनीचा बॉन्ड व पेरेपत्रकाआधारे फेरफार करण्याची मागणी"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
वाई बाजार/प्रतिनिधी
वडीलांनी घेतलेल्या जमीनीचा फेरफार होण्यापुर्वीच मृत्यू झाल्याने त्यांच्या मृत्यूने फेरफार न होवू शकलेल्या जमीनीचा बॉन्ड व पेरेपत्रकाआधारे फेरफार करण्याच्या मागणीसाठी येथील आदिवासी भावंंडानी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला असून वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असलेल्या या फेरफारप्रकरणी न्याय देण्याची मागणी केली आहे…
वाई बाजार येथील मनोहर नागो सलाम व सिद्धार्थ दौलतराव भरणे यांनी दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी तहसिल कार्यालय माहूरसह महामहिम राष्ट्रपती, प्रधानमंत्री तसेच विविध कार्यालयांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, मौजे वाई बाजार येथील शेत सर्वे नं. 212 जमीन बॉन्डव्दारे त्यांचे वडील नागो भिकू सलाम यांनी सन १९६६ मध्ये ३ रूपये ५० पैसे बॉन्ड वर घेतली होती. त्यावेळी बॉन्डवर घेतलेल्या जमीनीचा फेरफार होण्याआगोदरच नागो भिकु सलाम यांचा मृत्यू झाला असल्याने त्या जमीनीचा त्यावेळी फेरफार होवू शकला नाही. कालांतराने त्यानंतर त्याच जमीनीचे पेरेपत्रक अर्जदाराचे वडील बंधु उत्तम नागो सलाम यांच्या नावाने सन 1981-82 सुरू जाले. ते पेरे पत्रक 1985 ते 86 पर्यंत सुरू राहिले. तर त्याच जमीनीचे सन 1986-87 पासुन मल्लेशु इस्तारी व 1987-88 गंगाबाई मल्लेशु यांच्या नावाने पेरे पत्रक सुरू झाले.. अजूनही ते 1996-97 पर्यंत सुरू राहिले. विशेष म्हणजे त्यानंतर पुन्हा तेच पेरे सन 1997-98 मध्ये उत्तम नागो सलाम यांच्या नावे ने झाले… दरम्यान आता मोठा भाऊ उत्तम नागो सलाम यांचेही निधन झाले असून वडीलांनी घेतलेली शेतजमीन आता हयात असलेले दोघे भाऊ प्रकाश नागो सलाम व मनोहर नागो सलाम या आम्हा दोघा भावांच्या नावाने फेरफार करावा अशी मागणी निवेदनातून केली असून न्यायासाठी दि. 15/02/2024 उपोषण कर्ते मनोहर नागो सलाम 2) सिध्दार्थ दौलतराव भरणे सामाजिक कार्यकर्ता रा. वाई बाजार ता.माहुर जि.नांदेड यांनी आमरण उपोषणाचा दिला आहे…