शैक्षणिक

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमिवर रायझिंग रोझ इंग्लिश स्कूल वाई बाजार येथे स्नेहसंम्मेलन संपन्न..

'उच्च पातळीच्या कलाविष्काराने प्रेक्षकांना भुरळ..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

किनवट/माहूर
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रायझिंग रोझ इंग्लिश स्कूल येथे वार्षिक स्नेहसंम्मेलन मोठ्या दिमाखात पार पडले असून चिमुकल्यांच्या उच्च पातळीच्या कलागुणांतून निर्मित कलाविष्काराने प्रेक्षकांना अक्षरश: भुरळ पाडताना तब्बल पाच तास खिळवून ठेवले..

 

 

माहूर तालुक्यात शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या वाई बाजार येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील रायझिंग रोज इंग्लिश स्कूल प्रशासनाने दि. १० फेब्रुवारी रोजी येथील सहारा मंगल कार्यालयात वार्षिक स्नेहसंम्मेलन तथा सांस्कृतिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते. किनवट माहूर विधानसभेचे माजी आमदार प्रदिप नाईक यांच्यासह माजी जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव, डॉ. निरंजन केशवे, तंटामुक्ती अध्यक्ष कैलाश बेहेरे, फिरोजखान पठाण, विष्णू पडलवार, जावेद खिलजी, ज्योतिबा खराटे, अनिल रूणवाल, आतिष गेंटलवार तसेच अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा दैदिप्यमान सांस्कृतिक सोहळ पार पडला..

 

    तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन होवून कार्यक्रमाला औपचारिक सुरूवात झाल्यानंतर माजी आ. प्रदिप नाईक यांच्यासह डॉ. निरंजन केशवे यांनी आपल्या भाषणातून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तसेच अगदी ग्रामिण भागात अशा प्रकारचा उच्च कोटीची गुणवत्ता प्रदर्शित करणारा सांस्कृतिक सोहळा आयोजित केल्याच्या पार्श्वभुमिवर शाळा प्रशासनाचे कौतुक केले. तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. क्षमा मुनगीलवार यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून मागील अनेक वर्षांपासून संस्थेने केलेल्या विविध उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबरोबरच भविष्यात संस्थेकडून करण्यात येणार असलेल्या शैक्षणिक कार्यांचींही खुलासवार माहिती दिली…

 

 

    “अत्यंत उच्च कोटीचे कलाप्रदर्शन अन् तेवढेच भन्नाट पेहराव व अनेक भिन्न विषय घेवून चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने पालक व प्रेक्षकवर्गास तब्बल पाच तास खिळवून ठेवले….

 

 

   यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ. क्षमा मुनगीलवार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मेघा पिल्लेवार, छाया कल्याणकर, दीपाली कडुकर, प्रिया गावंडे, दीपाली कटकमवार, मनीषा गंजेवाड, अश्विनी राजूरकर, राधा पिल्लेवार, राधिका राकेश, द्रौपदी धोंगडे, आयेशा खान, मुस्कान खान, समीक्षा शिवणीतवार, मोनिका वाघमारे व अतिष काळे तसेच गजानन मुनगीलवार, शक्ती विश्वनाथवार, प्रथमेश मुनगीलवार, सर्वेश मुनगीलवार, आतिष काळे, अनुप गेंटलवार व अनेकांनी परिश्रम घेतले…

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close