शैक्षणिक

जि.प.केंद्रीय प्राथ.शाळेच्या चिमुकल्यानी श्रोत्यांना चार तास खिळवले..

वानोळ्यात रंगला सांस्कृतिक कार्यक्रम, चिमुकल्यांच्या विविध कला आविष्काराने श्रोते तल्लीन.

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

माहूर/प्रतिनिधी
देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्य माहूर तालुक्यातील वानोळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीने भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकापेक्षा एक उत्कृष्ट सादरीकरण करत चिमुकल्यांनी श्रोत्यांना चार तास खिळवून ठेवले.

 

विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून हा कार्यक्रम शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण चव्हाण हे होते तर उदघाटक म्हणून वानोळा गावच्या सरपंच सुनीता सिडाम ह्या होत्या. प्रमुख पाहुणे संतराम राठोड, उपसरपंच अभिजित राठोड, सेवानिवृत्त प्राचार्य वाय.एच.जाधव,उपाध्यक्ष संजय चव्हाण,वलभदास पवार, उत्तम राठोड, पत्रकार पंडित धुप्पे, किशोर राठोड, ,ग्रा.प.सदस्य राधाबाई आत्राम, श्यामपूर्णा भिसे, सुदाम चव्हाण, सुभाष आमटे, राजुसिंग राठोड, महावितरण चे वीज तंत्रज्ञ विजय धुप्पे, अमरसिंग चव्हाण,अमोल मोहिते, कैलास पोलसवार, माहूर गटसाधन केंद्राचे मा.समन्वयक संजय कांबळे,चलवदे,पत्रकार अँड.नितेश बनसोडे, शा.व्य.समिती सर्व सदस्य,केंद्रातील शिक्षक मित्र, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण चव्हाण यांनी तर उत्कृष्ट असे सूत्रसंचालन संजय चंद्रे यांनी केले.

 

यावेळी या सांस्कृतिक कार्यक्रमाची स्वागत गीताने सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात लोकगीते,कोळीगीते, बंजारा गीते, विविध वेशभूषा, भीमगीते, देशभक्तीपर गीते, फिल्मी गाणी आदी सह विविध गीतांवर चिमुकल्यांनी आपली कला सादर करून प्रेक्षक व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

 

दरम्यान मुख्याध्यापक राजेंद्र चारोडे लिखित दारू करी जीवनाची दुर्दशा ही लघुनाटिका या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. नृत्य सादर करणाऱ्या कलावंत विद्यार्थ्यावर प्रेक्षकातून कौतुकाचा व बक्षिसाचा वर्षाव झाला. माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील क्षेत्रात असलेल्या वानोळा जि प केंद्रीय प्राथमिक शाळेतील चिमुकले शिक्षण घेत असतांना गुणवत्तेबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण आदी बाबी मुळे आता वानोळा परिसर सुद्धा कोणत्याही क्षेत्रात मागे राहणार नसल्याची खात्री उपस्थित श्रोत्यांना झाली. यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक, माता, पिता सह वानोळा परीसरातून अनेक शिक्षण व संस्कृती प्रेमी नागरिकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी करून उपस्थिती दर्शविली होती.

 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदोन्नत मु.अ. माधव क्षीरसागर, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र चारोडे, शिक्षक विलास पोतुलवार, बालाजी केंद्रे, राजकुमार राठोड, बालाजी आरगुलवार, संजय चंद्रे, मनोज सोनकांबळे व कर्मचारी वृंद आदींनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close