राजकिय

युवानेते सचिन नाईक मित्रमंडळाच्या वतीने ‘व्हिजन माहूरगड’ या संकल्पाची मुहूर्तमेढ..!!

"आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमिवर युवानेते सचिन नाईकांनी दंड थोपटले..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
माहूर, प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर वर्षानुवर्षांपासून विकासात्मकदृष्या मागे पडलेल्या माहूर किनवट विधानसभेच्या सर्वांगीन विकास व भविष्यातील विकासकामांना नजरेसमोर ठेवून सचिन नाईक मित्रमंडळाच्या वतीने व्हिजन माहूरगड या अभिनव उपक्रमाची सुरूवात आज येथे पार पडलेल्या कार्यक्रमातून केली..
 माहूर येथील जगदंबा धर्मशाळेत पार पडलेल्या ‘व्हिजन माहूरगड’ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगी श्यामबापूजी भारती (बापू) हे होते. तर किनवट माहूर विधानसभा क्षेत्रातील विविध मान्यवर विचारपीठावर प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते..  दरम्यान मुसाखान यांनी युवानेते सचिन नाईक यांच्या संकल्पनेतून नजरेतसमोर आलेल्या ‘व्हिजन माहूरगड’ बाबत आपले विचार व्यक्त करताना माहूरगड हे पवित्र तिर्थक्षेत्र असल्याने हे शहर शुद्ध शाकाहारी होण्याबरोबरच सर्वच बाबतीत शुद्ध झाले पाहिजे अशी भावना व्यक्त केली. तर विविध छोट्या उद्योगांसोबतच बंद असलेला पैनगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासह नारळाच्या टाकाऊ मटेरियलपासून बनविण्यात येणारे साहित्य व त्यासाठी लागणारे उद्योग तसेच युवानेते सचिन नाईक यांच्या संकल्पनेतील प्रस्तावित विकासकामांबाबतचा थोडक्यात कार्यक्रम उपस्थितांसमोर ठेवला… 
  जेष्ठ पत्रकार नंदू संतान यांनी बोलताना माहूर शहरात सुरू असलेल्या मटका, गुटखा व झटका या अवैध धंद्यांबाबत सुरू असलेले वास्तव मांडले… तर विविध नेतेमंडळीकडून माहूर शहराचा ‘विकास’ नव्हे तर “भकास” केल्याचा घणाघाती आरोप केला. 
   युवा नेते सचिन नाईक यांनी आपले अभ्यासपुर्ण व त्ंत्रशुद्ध विचार मांडतांना माहूर आणि किनवट तालुक्यात फिरताना प्रकर्षाने जाणवलेल्या उणीवांकडे पाहता प्रत्येकाने किनवट माहूर तालुक्याचा सर्वांगीन विकास होण्याचा ध्यास बाळगला पाहिजे.. ही भावना व्यक्त करताना तालुक्यात उपलब्ध असलेल्या वनसंपत्तीच्या निमित्ताने हजारो कोटींचे उद्योगधंदे आणण्यासाठी भविष्यात याबाबतची मागणी व पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले. तर येथील नेत्यांजवळ विकास आराखडाच नसल्याने माहूरगडचा विकास खुंटला.. आणि हाच कळीचा मुद्दा..! असल्याचेही त्यांनी सांगीतले..
तर आपल्या अध्यक्षीय भाषणातून योगी श्यामबापू भारती यांनी.. माहूर हे अत्यंत प्राचिण तिर्थक्षेत्र असूनही माहूर तिर्थक्षेत्राचा विकास झालेला नाही.. स्वत: नांदेडचे मुख्यमंत्री असतानाही येेेे तिर्थक्षेत्राचा विकास करू शकले नाहीत.. केवळ तुटपुंजी रक्कम देवून तिर्थक्षेत्र विकासाच्या नावाखाली केवळ माहूरकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम तत्कालिन वेळेत करण्यात आले. त्यामुळे या तिर्थक्षेत्र विकासाचा कंटाळा येतोय..? का जाणिवपुर्वक ही बाब घडतेय याबाबत कळण्यास मार्ग नसल्याचेही त्यांनी सांगीतले… दरम्यान येत्या काळात लोकसभेवर निवडून गेल्यास अनेक प्रस्तावित विकासकामे करणार असल्याचा कार्यक्रम त्यांनी यावेळी बोलून दाखवला…
एकंदरीत वर्षापासून विकासात्मकदृष्या पिछेहाट झालेल्या किनवट माहूर विधानसभेसाठी युवानेते सचिन नाईक यांंचे “व्हिजन माहूरगड” ची संकल्पना माहूरवासियांना भन्नाट चर्चेत असून सचिनभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है.. ची भावना अनेक उपस्थितांनी यावेळी बोलून दाखविली…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close