सामाजिक

‘सगे-सोयरे’ या निष्कर्षाआधारे “मराठा- ओबीसी” समूहात राज्य सरकारकडून भांडणे लावण्याचे षडयंत्र- प्रा.रामचंद्रजी भरांडे

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

नांदेड/प्रतिनिधी (धोंडोपंत बनसोडे)

सगे-सोयरे या निष्कर्षाआधारे मराठा- ओबीसी समूहात राज्य सरकारकडून भांडणे लावण्याचे षडयंत्र होत असल्याचे मत प्रा.रामचंद्रजी भरांडे यांनी येथील जिल्हा ओबीसी पदाधिकारी व कर्मचा-यांच्या चिंतन व मनन बैठकीत व्यक्त केले..

 

नांदेड येथील व्हीआयपी शासकीय विश्रामगृहात दि. २८ जाने. रोजी जिल्हा ओबीसी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसह लोकस्वराज्य आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने चिंतन व मंथन बैठक प्रा. रामचंद्रजी भरांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी नांदेड जिल्ह्यासह शहरातील ओबीसी समाजातील अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नांदेड जिल्ह्यातील लोकस्वराज्य आंदोलनाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान शिवसेना-भाजप या सत्ताधारी सरकारने सगे-सोयरे हा मुद्दा निष्कर्ष मानुन मराठा समाजास सरसकट ओबीसीचे प्रमाणपत्र देण्याचे अनाधिकृत परिपत्रक काढून त्या परिपत्रकाला कोणताही संवैधानिक अधिकार नसताना जाणीवपूर्वक मराठा व ओबीसी समाजात आरक्षणाच्या मुद्द्याहुन भांडणे लावण्याचा प्रयत्न होत असल्याचे मत व्यक्त केले. तर येणाऱ्या आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपली राजकीय पोळी शेकून घेण्याच्या उद्देशानेच हा निर्णय घेतलेलाआहे.

 

हा निर्णय असंवैधानिक व चुकीचा असल्याचे ओबीसी मान्यवरांनी यावेळी आपल्या मनोगतात म्हटले. यामुळे ओबीसी समाजात राज्य सरकार विरुद्ध तीव्र भावना निर्माण झालेली असून येणाऱ्या काळात ओबीसी समाजाच्या वतीने व लोकस्वराज्य आंदोलनाच्या नेते, पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने गावोगावी जाऊन ओबीसी आरक्षण व राज्य सरकारची घेतलेली चुकीची भूमिका याविषयी जनजागृती करुन येणाऱ्या काळात शिवसेना शिंदे गट व भाजप सरकार हे ओबीसी समाजाची मते घेऊन सत्तेवर येणाऱ्या सरकारला केंद्रातुन व राज्यातुन सत्तेच्या बाहेर करण्यासाठी आपण तन-मन-धनाने सर्वांच्या विचाराने, एकमताने निश्चितच काम करु असा ठाम विश्वास लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रा.रामचंद्रजी भरांडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून मत व्यक्त केले… यामुळे येणाऱ्या काळात ओबीसी समाजातील बुद्धिजीवी वर्ग, अधिकारी कर्मचारीवर्ग, सेवानिवृत्त कर्मचारी आणि लोकस्वराज्याचे सर्वच महाराष्ट्रातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ओबीसी समाजाला न्याय द्यायची भूमिका घेतली जाईल. तसेच गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी आम्ही त्यांच्या आरक्षणाच्या विरोधात नसून ओबीसींवर अन्याय होता कामा नये या बाजूचेआहोत. अशी सुद्धा ठाम भूमिका प्रा.भरांडे यांनी घेतली. येणाऱ्या काळात ओबीसी समाज व लोकस्वराज्य आंदोलन खांद्याला खांदा लावुन एक विचाराची वज्रमुठ निर्माण करून या शिवसेना-भाजप सरकारच्या विरोधात लढा लढून मराठा विरुद्ध ओबीसी समाज असा वाद निर्माण करून महाराष्ट्रात गावागावात वाद,भांडण, तंटे कायदा- सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना खाली खेचल्या शिवाय आता गप्प बसणार नसल्याचे अनेक ओबीसी समाजातील पदाधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी यांनी यावेळी ठासुन सांगितले आहे. यासाठी आम्ही आता तन-मन-धनाने रस्त्यावर उतरु अशीही यावेळी सर्वांनी एकमताने सांगितलेआहे.

 

या भव्य चिंतन व मंथन बैठकीला ओबीसी समाजाचे प्रा.दत्ता कुंचलेवाड, इंजि.लक्ष्मण लिंगापुरे, सतीशचंद्र शिंदे, दत्ता चापलकर, आर.जी.जाधव, श्रीमंत राऊत, मारोती घोरपडे, संगीता पवळे, दिक्षा खिल्लारे मराठवाडा अध्यक्ष बी.आर.पारसकर, प्रदेश सरचिटणीस नामदेव गायकवाड छत्रपती संभाजीनगर, कामगार आघाडीचे रावसाहेबदादा पवार, प्रदेश उपाध्यक्ष व्ही.जी.डोईवाड, ज्येष्ठ नेते नागोराव नामेवार, बी.एम.गोणारकर, अर्जुन गायकवाड मालेगांवकर, संभाजीराजे वाघमारे बारुळकर, सुनील जाधव, अंकुशदादा गायकवाड, डी.के.पवार, दशरथ आंबेकर ईरेगावकर सह अनेक जिल्हा नेते, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, महानगराध्यक्ष असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन धोंडोपंत बनसोडे जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर जिल्हा, जयभारत सुर्यवंशी पत्रकार नांदेड यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close