ईतर

बातमीत चुकीचा शब्दप्रयोग केल्याचा ठपका ठेवत माहूर तालुक्यातील ‘त्या’ पत्रकारांवर “नोटीस बाँब”…

"दिलगीरी व्यक्त करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा..! प्रकरण चिघळण्याची शक्यता..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 किनवट/माहूर

न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून त्याचे वृत्तांंकन केल्याचा ठपका ठेवत एका संपादकासह १७ पत्रकारांवर नोटीस बाँब पडला असून चुकीच्या शब्दप्रयोगातून झालेली बदनामी पाहता ‘त्या’ माध्यमांना आपापल्या माध्यमांतून दिलगीरी व्यक्त करा असा इशारा नोटीसकर्त्याने दिला असल्याने एकच खळबळ उडाली आहे…

 

 

 

माहूरच्या प्रथमवर्ग न्यायालयाने दि. १९ जानेवारी रोजी वाई बाजार येथील एका मृत्यू प्रमाणपत्राच्या प्रकरणात एक आदेशिका जारी केली होती. त्या आदेशिकवरून अनेक मध्यामांवरून वृत्त प्रकाशित झाले होते. परंतू प्रकाशित करण्यात आलेल्या मजकूरातील काही मजकूर खोटा तसेच चुकीचा शब्दप्रयोग करून समाजात बदनामी केल्याचा ठपका ठेवत वाई बाजारचे तंटामुक्ती अध्यक्ष कैलाश शंकरराव बेहेरे यांनी वृत्त प्रकाशित करणा-या एका संपादकासह माहूर तालुक्यातील तब्बल १७ जणांविरोधात नोटीस बजावल्या असून वृत्त प्रकाशित करणा-या माध्यमांनी आपल्या वृत्तपत्रांतून माफिनामा प्रकाशित करून दिलगीरी वक्त करावी.. अन्यथा न्यायालयीन कार्यवाहीसाठी सज्ज व्हा असा इशारा सदर नोटीसीतून दिला आहे…

 

 

[नोटीसकर्त्याचे मत]
“ज्यांना पत्रकारीतेचे थोडे हि ज्ञान नाही अशांचा या क्षेत्रात शिरकाव झाला आहे व कॉपी पेस्ट प्रणालीमुळे त्यांचे जमत आहे. एकाने बातमी बनवायची व ती दहा जणांनी जशीच्या तसी आपल्या वृत्तपत्रास लावायची हा प्रकार सध्या माहूर तालुक्यात प्रचलीत झाला आहे. जो बातमी लिहीतो त्यामध्ये त्याचा फायदा दडलेला असतो पण ईतरांनी हि त्याचाच कित्ता गिरवावा हे मुर्खपणाचे लक्षण आहे. हि अंगलट येणारी बाब आहे. बातमीमध्ये सत्यता असली पाहिजेत, बातमी घटनेशी अनूरूप असायला पाहिजेत. नको ते मजकूर टाकून दुसऱ्यांची नाहक बदनामी करणे बरे नाही व हे कोणालाही सहन होणारे नाही. माझ्या बाबतीत हेच घडले म्हणून मी अशा पत्रकारांना कायदेशीर नोटीस बजावली आहे व पुढील कारवाई अद्याप बाकी आहे. व लवकरच ती अंमलात येईल..   
            – कैलाश शंकरराव बेहेरे
तंटामुक्ती समिती अध्यक्ष, वाई तथा नोटीसकर्ता

 

()()()()()()()()()()()()()()()()()()()()()()()()()()

 

 

[प्रकरणातील याचिकाकर्त्याचे मत]

[…… सन्माननीय न्यायालयाने जो निकाल दिला त्या निकालाच्या अनुषंगाने माझ्यासह विविध वृत्तपत्राच्या पत्रकार बांधवांनी याविषयी बातमी प्रकाशित केली परंतु कार्यवाहीमुळे खचून गेल्याने व आकाशापोटी पत्रकार बांधवांना बिनबुडाचे व तथ्य नसलेली नोटीस पाठवून माफी मागण्याचे सुचित केले आहे. वास्तविक पाहता पत्रकार बांधवांनी सन्मा. न्यायालयानी जो निकाल दिला आहे व जे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. त्याच अनुषंगाने वृत्तांकन केले आहे. या संदर्भात दिलेल्या नोटिसाचा कुठलाही खुलासा व माफी नामा देणार नाही.संबंधितांने न्यायालयात दाद मागत असेल तर त्यांना न्यायालयात उत्तर देण्याची आमची तयारी आहे.… 

  –   कार्तिक शंकरराव बेहेरे,

    प्रकरणातील याचिकाकर्ता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close