ईतर

राष्ट्रीय दूरसंचार निगम सल्लागार पदी विजय आमले यांची निवड..

'पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला अखेर न्याय मिळाला...!!'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

श्रीक्षेत्र माहूर/प्रतिनिधी

माहूर शहरातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा श्री रेणुका मातेचे वंशपरंपरागत पुजारी विजय दत्तात्रेय आमले यांची भारत सरकार राष्ट्रीय दूर संचार निगम समितीच्या सल्लागारपदी निवड झाल्याने माहूर तालुक्यातील जनतेतून त्यांचे अभिनंदन होत असल्याने पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय मिळाला असल्याची चर्चा ऐकावयास मिळत असून त्यांच्या निवडीने पक्षांतर्गत गटबाजी करणाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे.

 

माहूर शहरासह तालुका जिल्हा भरात पक्षाने सोपविलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत केंद व राज्य सरकारच्या विविध जन कल्याणकारी योजनांची माहिती घराघरात पोचविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत इतर सर्व कार्यक्रम 100% टक्के यशस्वी करणारा पक्षनिष्ठ आणि कट्टर कार्यकर्ता म्हणून विजय दत्तात्रय आमले यांची ओळख आहे वयोवृद्ध असुन देखील तरुणांना लाजवेल अशी कामे त्यांच्या हातून घडलेली असल्याने तसेच पक्षांचे आदेश शिरसावंद्य मानून तालुक्यात पक्ष वाढीसाठी तसेच सरकारच्या योजना दारोदारी पोहोचविण्यासाठी अहोरात्र झटणारा कुठल्याही पदाची अपेक्षा न करता काम करणारा कार्यकर्ता म्हणून विजय आमले यांची माहूर तालुक्यात ओळख आहे.

 

माहूर तालुक्यात वेळोवेळी पक्षांतर्गत बंडाळी होत असल्याने मिळेल ते पद घेण्यासाठी कार्यकर्त्यात चढाओढ लागलेली असून ज्येष्ठ पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना पक्षाकडून देण्यात आलेले पद रद्द करून त्या पदावर बसण्यासाठी नको त्या पातळीवर जाणारे नेते मंडळींनी विजय आमले यांना तालुक्यासह जिल्ह्यात कुठलेच पद मिळू नये यासाठी कंबर कसली होती त्या मंडळींना विजय आमले यांची दूरसंचार निगमच्या सल्लागारपदी निवड झाल्याने विजय आमले सारख्या कार्यकर्त्याची पक्षाने योग्य ठिकाणी निवड केल्याने जेष्ठ पत्रकार नंदकुमार संतान, विश्वस्त चंद्रकांत भोपी ,संजय कान्नव,आशिष जोशी, दुर्गादास भोपी,माजी सभापती वसंत कपाटे, तालुका सरचिटणीस अपिल बेलखोडे ,नगराध्यक्ष फिरोज भैया दोसानी, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, माजी नगराध्यक्ष समरभाऊ सचिन नाईक,त्रिपाठी,सुमित राठोड, विलास चौधरी, भाजपा तालुका अध्यक्ष, श्रीकांत घोडेकर, जोतीराम राठोड, सुमित राठोड,यांचेसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close