ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा माहूर तालुका पत्रकार संघाकडून निषेध…!
"तहसीलदार माहूर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन..!"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
माहूर/प्रतिनिधी
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पुण्यात केलेल्या भ्याड हल्लाप्रकरणी माहूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत हल्लेखोरांचा निषेध करण्यात आला…
जेष्ठ पत्रकार निखिल वागळे हे पुण्यातील ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमासाठी व्याख्याता म्हणून जात असताना येथील खंडोजीबाबा चौकात निखिल वागळेंचं वाहन अडवून, सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि शाईफेक करत हल्ला केला होता.. जेव्हा विचारांचा सामना विचारांनी करता येत नाही तेव्हा असे भ्याड हल्ले होतात. सुसंस्कृत महाराष्ट्रात जे घडतंय ते संतापजनक आणि चिंताजनक आहे. महाराष्ट्रात एका बाजुला गोळ्यांचे आवाज येत आहे. महिन्यात पाच ठिकाणी गोळीबार झाले आहेत आणि दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडूनच पत्रकार आणि बुध्दिजिवींवर हल्ले केले जात आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच केला जात आहे. हे चित्र भयंकर असलयानं या झुंडशाहीचा आम्ही निषेध आम्ही करीत आहोत..
निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा त्रिवार धिक्कार अशा असायचे निवेदन पत्रकार हल्ला विरोधी समितीचे प्रमुख एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत कपाटे, विजय आमले, साजिद खान, डॉ.जयप्रकाश द्रोनावार, नंदकुमार संतान, गजानन भारती, बालाजी कोंडे, बाबाराव कंधारे, राजू दराडे, विश्वास पंडागळे, अविनाश टनमने, गोपाळ खापर्डे, अपील बेलखोडे, प्रा.प्रवीण बिरादार, राज ठाकुर, विश्वनाथ कदम यांनी तहसीलदार यांना दिले…
या वेळी ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान म्हणाले की, जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यात सत्ताधारी कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यातून ते बालंबाल बचावले. वागळे यांच्यावरील हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारांवरील हल्ला म्हणजे लोकशाहीवरील हल्ला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात लोकशाहीवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही. निखिल वागळे लोकशाही मार्गाने आपले विचार जनतेपुढे मांडत आहेत. गाडी फोडून निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणे या पद्धतीने त्यांच्या विचारांना विरोध करणे निषेधार्ह असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले…