सामाजिक

दुसरा पर्याय शोधण्याच्या सुचना करत माहूरात डिजे वाजविण्यास पोलिस प्रशासनाकडून बंदी….

"आक्रमक उत्सव समितीने मात्र केला सर्वच पक्षाचा निषेध ; नेत्यांना श्रद्धांजलीच्या फलकांने एकच खळबळ"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

श्रीक्षेत्र माहूर/प्रतिनिधी

संत सेवालाल महाराज व शिवजयंतीच्या निमित्ताने महापुरूषांच्या संयुक्त जयंती करण्यासाठी डिजे वाजवण्याची परवानगी मागणा-या सार्वजनिक शिव जन्मोत्सव समिती तसेच संत सेवालाल महाराज जन्मोत्सव समिती संयोजकांना माहूर पोलीसांनी परवानगी नाकारत डिजे ऐवजी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सुचना केल्याने आक्रमक झालेल्या जयंती महोत्सव समितीकडून संताप व्यक्त करताना तालुक्यातील सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या श्रद्धांजलीचे फलक लावल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे..

 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच संत सेवालाल जयंती या महापुरूषांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने या उत्सव समितींकडून माहूर येथील पोलीस ठाण्यात जाऊन डिजे वाजविण्याची परवानगी मागितली होती. दरम्यान माहूर पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रकाश मुळे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत परवानगी नाकारली. तर डिजे ऐवजी दुसरा पर्याय वापरण्याच्याही सुचना केल्या. यावर उत्सव समितीने संताप व्यक्त करतांना सर्वच पक्षांच्या बोध चिन्हावर निषेधाची खूण करून निषेध नोंदविणारे बॅनर सार्वजनिक जागेवर झळकवले असून सार्वजनिक उत्सव समितीने आपल्या तीव्र भावना व्यक्त करतांना संपूर्ण महाराष्ट्रात डीजे वाजतो..परंतु माहुर शहरातच त्यावर बंदी का..? आम्हा हिंदूचे सण आल्यावरच बंदी का..? आमचे सण आम्ही कसे साजरे करावे हे आम्हांस प्रशासन शिकविणार का..? असे प्रश्न नोंदवून आमच्या सणांच्या वेळी ही बंदी आमच्यावर अन्यायकारक असतांनाही सर्वच राजकीय नेते मुग गिळून गप्प बसले… ही मोठी शोकांतिका असल्याचे शब्द रूपाने त्या बॅनरवर लिहून सर्व राजकीय नेत्यांना शब्दरूपी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close