राजकिय

जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर माकपा ची रॅली व जाहीर सभा…

"काॅ.मा.खा.वृंदा करात,शेतकरी नेते डाॅ.अशोक ढवळे करणार संबोधीत"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
     मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतिने जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर तथा संविधान वाचवा, देश वाचवा, अधिकार वाचवा चा नारा देत रॅली व जाहीर सभेचे आयोजन दि.२२ फेब्रुवारी रोजी किनवट येथील हु. गोंडराजे मैदान येथे करण्यात आले आहे.

 

   दरम्यान चिमटा धरण रद्द करा, किनवटला जिल्हा घोषित करा, वन, देवस्थान, गायराण जमिनीची मालकी द्या, योजना कर्मचा-यांना किमान वेतन द्या, रोजगार, बेघरांना घरकुल मंजूर करा, हामीभावाचा केद्रिंय कायदा करा, निराधारांना पेशंन या जनतेच्या ज्वलंत मागण्यानां घेऊन रॅली व सभा होणार असुन हजरोंच्या संख्याने शेतकरी – कामगार-कष्टकरी-महीला-युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन मा.क.पा नेत्यांनी केले आहे. तर मोदी सरकारच्या धर्मांध, हुकुमशाहीवादी, भांडवलदार धार्जीण्या धोरणा विरोधात संवैधानिक मूल्यांची होणारी पायामल्ली रोखण्यासाठी जनतेचा संघर्ष तिव्र करण्याच्या अनुशंगाने मा.क.पा.च्या वतिने या रॅली व जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
मराठवाडा आणि विदर्भाच्या सिमेवर होणारे चिमटा धरण हे हजारो शेतकरी व कष्टक-यांचे विस्थापण करणारे असुन धरण रोखण्यासाठी धरणग्रस्त जनतेने पूर्ण ताकदिनीशी रॅली व सभेस उपस्थित राहणार असल्याची  माहिती धरणग्रस्त संघर्ष समितीने दिली  आहे… तर या सभेसाठी शेकडो गावात मा.क.पा च्या सभा संपन्न झाल्या असून आगामी काळात राजकीय पर्याय उभा करण्यासाठी मा.क.पा ने हाक दिली आहे.
या रॅली व सभेसाठी मा. खासदार वृंदा करात दिल्ली, शेतकरी आंदोलनाचे प्रमुख नेते काॅ. डाॅ. अशोक ढवळे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संविधान प्रेमी जनता, शेतकरी, कामगार, कष्टक-यांनी मोठ्या संख्याने रॅली व जाहिर सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन मा.क. प. च्या वतीने करण्यात आले आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close