ईतर

विधान परिषद आमदार अमर राजूरकर यांनी घेतली द.भ.प.साईनाथ महाराज यांची भेट..

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

माहूर/प्रतिनिधी

  नुकतेच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले नांदेड येथील माजी विधान परिषदेचे आमदार अमर भाऊ राजूरकर यांच्या नांदेड निवासी राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांनी सदिच्छा भेट दिली.तसेच श्रीदत्त ज्ञानाचा उपदेश केला.

विधान परिषद आमदार अमर राजूरकर हे श्रीदत्ताचे निस्सीम भक्त आमदार ते माहूरगड स्थित श्री.आनंद दत्त धाम आश्रमात नित्य नेमाने येणारे व सद्गुरु राष्ट्र संत साईनाथ महाराज वसमतकर यांचे अनुयायी आहेत. अनेक विधायक उपक्रमात ते आश्रमासाठी मदतीसाठी पुढे येतात. तसेच सद्गुरु द.भ.प.साईनाथ महाराज यांना ते आपले अध्यात्मिक गुरुही मानतात.

  विशेष म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन आपल्या नव्या राजकीय इनिंग ची सुरवात केली असून त्यादृष्टीने सद्गुरु राष्ट्रसंत द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर यांचे उपदेश व आशीर्वाद त्यांना शिरवंद वाटतात. साईनाथ महाराज वसमतकर यांच्या गृहभेटी दरम्यान झालेल्या चर्चेनंतर महाराजांनी त्यांना भावी वाटचालीस आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close