ईतर

‘संजय गांधी निराधार योजना’ समितीवर अर्चना दराडे यांची निवड…

"गरजू लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा निश्चय"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

माहूर,प्रतिनिधी

   संजय गांधी निराधार योजना समितीच्या माहूर तालुका कार्यकारीमीवर तालुक्यातील धडाडीच्या महिला पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्त्या अर्चना दराडे यांची निवड करण्यात आली असून समितीवर निवड झाल्याने ख-या व गरजू लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला आहे… 
   शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना राबवली जाते. या योजनेतंर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा (आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी, 35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना
या योजनेखाली लाभ दिला जातो…
    दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांचे पत्र जा.क्र./मंत्री ग्रा.वि.व.पं.रा/पर्यटन/नोट ३२४/२३/शा.नि. दि. २७/०९/२०२३ यांच्या पत्रातील शिफारशीनुसार जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या कार्यालयाचे पत्र जा.क्र. २०२३/विसयो/संगायो समिती/माहूर/कावि-ई९०८६२६ दिनांक ०९/०२/२०२४ नुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या माहूर तालुका समितीची निवड करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी जिवन बळीराम जैस्वाल तर सदस्य पदी सौ. अर्चना राजू दराडे यांच्यासह मनोज कुंडलिक मुनेश्वर, विजय नागोराव मंगाम, निळकंठ कृष्णराव म्हस्के, अजय काशिराम पवार, नंदकुमार दत्तात्र्यय कोपलवार यांची निवड करण्यात आली आहे…तर उपरोक्त नियुक्त केलेले अध्यक्ष व सदस्य यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक शासन निर्णय दि. २०.०८.२०१९ नुसार नियमित घेवुन शासनाचे आदेशानुसार लाभार्थ्याचे अर्ज मंजूरीबाबतची कार्यवाही करण्यात यावी. असेही जिल्हाधिका-यांच्या पत्रातून सांगितले आहे…
   “विशेष म्हणजे माहूर तालुक्यात या योजनेचा असंख्य बोगस लाभार्थी आजही लाभ घेत असून या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तालुक्यातील काही दलाल मंडळी बोगस लाभार्थ्यांकडून तब्बल तीन ते पाच हजार रूपये वसून करून तहसील मधील काही चिरीमीरीखोर कर्मचा-यांच्या माध्यमातून बोगस लाभार्थ्यांचा शिरकाव निरंतरपणे करत आहेत.. तर नवनियुक्त समितीकडून ख-या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या योजनेतून निरंतर लाभ घेत असलेल्या बोगस लाभार्थ्यांची चौकशी करून नेमके बोगस कोण..? हे शोधून काढण्याचे कडवे आव्हान असून ख-या लाभार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात लाभ मिळवून देण्यासाठी नवनियुक्त समितीने वाटचाल करावी अशी माफक अपेक्षा गरजूंंनी व्यक्त केली आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close