किनवट /माहुर विधानसभा प्रमुखपदी बाबुराव केंद्रे…
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
श्रीक्षेत्र माहूर
आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबिसी आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे यांची किनवट/माहुर विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
आगामी विधानससभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने किनवट मतदार संघात जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यानुसार पक्षश्रेष्ठींनी ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे यांची किनवट/ माहुर विधानसभा निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती केली आहे. दि ७ ऑगस्ट रोजी किनवट येथील पक्षाच्या लोकार्पण जनसंपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या हस्ते व आ. भीमराव केराम यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले…
विद्यार्थी दशेपासून बाबुराव केंद्रे हे पक्षात एकनिष्ठपणे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी किनवट तालुकाध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ.पंकजाताई मुंडे, श्रीकांत भारतीय, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या आदेशानुसार तसेच किनवट विधानसभेचे कार्यतत्पर आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिका-यांना सोबत घेऊन विधानसभा निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवून दाखवणार असा ठाम विश्वास बाबुराव केंद्रे यांनी व्यक्त केला आहे. भाजपा तालुध्यक्ष श्रीकांत घोडेकर,ॲड दिनेश येऊतकर,भाजपा तालुका सरचिटणीस अर्चना राजु दराडे, बिग एल कांगणे, बिभिषण पाळवदे, नारायण दराडे, नंदकुमार जोशी, अनिल वाघमारे, नंदु कोलपवार, संतोष तामखाने आदींनी या नियुक्तीचे अभिनंदन केले आहे…