राजकिय

उपमुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानामुळे धरणग्रस्त गावात भाजपाविरूध्द असंतोष…

"आ. केरामांच्या खुलाशाने जनतेचे समाधान नाहीच..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

(बाबाराव कंधारे)

निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात माहूर किनवट तालुक्यातील निम्न पैनगंगा प्रकल्पात येणा-या धरणग्रस्त 42 गावांचे मतदान उद्याच्या निवडणूकीत कुणाच्या पारड्यात जाणार याबद्दल वरील गावांच्या पारावर चर्चा चालू असून नुकतेच किनवट येथे आलेले महाराष्टाच्या राजकारणाचे किंंगमेकर उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणविस यांंनी निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम आचार संहितेनंतर मार्गी लावू असे द्विधाजनक वक्तव्य केल्यानंतर याबाबत दरणग्रस्त गावांत तिव्र असंतोषाचे वातावरण पसरले आहे..

 

निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबतच्या उपमुख्यमंत्री महोदयांच्या ‘त्या’ विधानावर माध्यमांनी खरपुस समाचार घेतल्यानंतर दैवयोगाने आमदार झालेले भाजपाचे भिमरावजी केराम यांनी केवळ सारवा-सारव करण्यासाठीच समाजमाध्यमांवरून न पटणारा खुलासा दिला असल्याची ओरड धरणग्रस्तांमधून होत असून उपमुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्याने चिंताक्रांत झालेले धरणग्रस्त मात्र कमालिचे दुखावले गेले आहेत.. उपमुख्यमंत्र्यांचे ते विधान म्हणजे गंभीर जखमेवर मीठ लिंबू चोळल्यागत झाल्याची भावना धरणग्रस्तांकडून व्यक्त होत आहे…

 

सन 1920 मध्ये ब्रिटीश सरकारने निम्न पैनगंगा उर्फ चिमटा धरणाचे सर्वेक्षण करून तेलंगणाला लाभ मिळवून देेणारे हे धरण उभारणीसाठी शिफारस केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या राज्यात माजी मंत्री शिवाजीराव मोघे व त्यांच्या निकटवर्तीय राजकारण्यांनी कवडीमोल भावात हजारो एकर जमीन घेवून ती जमीन कोट्यावधीत विकण्यासाठी या धरणाचा आग्रह धरला होता. गेल्या पंचविस वर्षात निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीने शांततामय आदोलन, जेलभरो आंदोलन तसेच गावोगावी सरकारविरोधी निषेधाचे बंड उभारून देखील केवळ पन्नास हजार कोटी उभारणीतील पाचशे कोटीचा मलिदा जाताजाता लाटण्यासाठी खंबाळा येथे कामकाज सुरू केल्याची सर्व धरणग्रस्तांना याची जाण आहे.. त्यातच उपमुख्यमंत्र्यांनी आगीत तेल ओतून कुंभकर्णी झोपेत असलेल्या धरणग्रस्तांना जागे केले असून ते मतदान नेमके कुणाला जाणार..? यावरच हिंगोली लोकसभा मतदार संघाचे भवितव्य अवलंबून आहे…

 

विशेष म्हणजे हिंगोलीचे यावेळचे खा. हेमंत पाटील यांनी जागोजागी उच्चपातळी बंधारे करण्याची घोषणा केली होती. तर मग या धरणाचे प्रयोजन नेमके काय ? असा आक्रोष धरणग्रस्त करत आहेत. कुण्याही पक्षाला मतदान मिळाले तरीही निवडणुकीनंतर एखादा शेतकरी शेतमजूराचाच पोर आवाज उठवू शकेल.. असा विश्वास येथील धरणग्रस्तांकडून व्यक्त होत असून सध्याचे प्रमुख उमेदवार हे मोठे गुत्तेदार किंवा गुत्तेदारांचे नातलग असल्याचेही बोलले जात आहे…त्यामुळे ज्या उमेदवाराला निवडून यावयाचे आहे. त्यांनी या धरणग्रस्त गावांतील जनतेला लेखी स्वरूपात बाँडवर नोटरीसह लिहून द्यावे..तसेच जर मी धरण विरोध करणययात अकार्यक्षम ठरलो तर राजीनामा देईल.. असे लिहून दिले तरच तरच उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने रक्तबंबाळ झाल्यागत अवस्था झालेल्या धरणग्रस्तांच्या जखमेवर मलमपट्टी लावल्यासारखे होईल… अन्यथा मतदारांचा “शिक्का” कुणाकुणाा ला “मुक्का” मारणार याचे उत्तर येणारा काळच देणार आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close