सामाजिक

रूपा नाईक तांडा येथील पैसे वाचवण्यासाठी होत असलेल्या ‘जलजीवन मिशन’ च्या ‘त्या’ बोगस कामाविरोधात ग्रामस्थ आक्रमक….

'जुन्या विहीरीचेच खोदकाम न करता नवीन विहीर खोदण्याची मागणी'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

किनवट/माहूर

    रूपा नाईक तांडा येथील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या बोगस कामाविरोधात ग्रांमस्थांनी आक्रमक भुमिका घेतली असून पुरेसा निधी उपलब्ध होवूनही केवळ पैसे वाचविण्यासाठी होत असलेल्या कामात प्रशासनाने नवीन ठिकाणी विहीर खोदकाम करून पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचे निवेदन ग्रामस्थांनी मुख्यकार्यकारी अधिका-यांसह प्रशासनाला दिले आहे…

 

माहूर तालुक्यातील मैजे रूपा नाईक तांडा येथील गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी नवीन विहीर खोदुन पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्याची मागणी येथील तब्बल दिडशे नागरीकांनी प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.. दरम्यान येथील नागरीकांनी दिलेल्या लेखी निवेदनानुसार जि.प.नांदेड (जल जिवन मीशन) यांचे इ. टेंडर नोटिस नं. 36 2022-23 अंतर्गत रुपा नाईक तांडा ता. माहुर जि. नांदेड येथे नवीन विहीरीच्या कामासाठी शासनाकडुन 41,64,725/- रुपये (जि.प.नांदेड पाणी पुरवठा योजने अंतर्गत) मंजुर झाले आहेत.. तथापि या कामात जास्तीत जास्त पैसे उरवण्याच्या मानसिकतेतून नवीन विहीरीचे खोदकाम करण्याऐवजी गावातीलच एक अत्यंत जुन्या विहीरीलाच खोदकाम करण्याचा घाट ग्रामसेवकाच्या संगनमताने सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे…

 

 

विशेषत: त्या जुन्या विहीरीला अत्यंत कमी पाणी असून उन्हाळ्याच्या दिवसात त्या विहीरीत एक थेंब ही पाणी राहत नसल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून या कामात जास्तीती जास्त पैसे उरावेत या हेतूने गावच्या राजकारणी मंडळीसोबतच ग्रा.पं.चे सर्व सदस्य, लिपीक, सरपंच, ग्रामसेवक, प्रशासक व ग्रा.पं.च्या माजी सदस्यांनी जुन्या विहीरीवरच खोदकाम करावयाचे ठरवले आहे. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आली असून गावकऱ्यांनी उपरोक्त जुन्या विहीरीच्या खोदकामाला प्रचंड विरोध दर्शवला आहे.. त्यामुळे निवेदनात नमुद केलेल्या बाबींची गभीर दखल घेवून जुन्या विहीरीच्या खोदकामाला मान्यता न देता नवीन विहीरीच्या खोदकामासाठीच मान्यता द्यावी…अन्यथा गावकऱ्यांकडून उग्र आंदोलनाबरोबरच आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नांदेड यांना ग्रामस्थांतर्फे देण्यात आले आहे….

निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासह कार्यकारी अभियंता (ग्रामीण पा.पु. विभाग) जि.प.नांदेड, सहाय्यक जिल्हाधिकारी
उपविभागीय कार्यालय किनवट, तहसिलदार माहूर, उपविभागीय अधिकारी (ग्रामीण पा.पु.) उपविभाग किनवट, गटविकास अधिकारी पं. स. माहुर, प्रशासक/ ग्राम विकास अधिकारी, ग्रा.पं.रुपानाईक तांडा तसेच विवीध माध्यम प्रतिनिधींंना देण्यात आल्या असून निवेदनावर विष्णु मोहन राहोड यांच्यासह नामदेव गुलाबसिंग राठोड (पो. पाटिल), सुरसिंग कोंडबा चव्हाण, विष्णु किशन राठोड, तुकाराम फुलसिंग चव्हाण सुहास शिवलाल राठोड, मनिराम सकरू चव्हाण, दसराम जोगराम पवार, रघुनाथ वाघोजी चव्हाण, रमेश मोहन जाधव तसेच इतरही तब्बल दिडशे ग्रामस्थांच्या स्वाक्ष-या आहेत…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close