ईतर

माहूर वनपरीक्षेत्राअंतर्गत अवैध वृक्षतोड अद्यापही सुरूच….

"वनविभागाकडून सर्वकाही दिसत असूनही न दिसल्याचा आव..!"

(Bk महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

(बाबाराव कंधारे)

    माहूर वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत अवैध वृक्षतोडीच्या संख्येत विक्रमी स्वरूपात वाढ झाली असताना याबाबत माध्यमांतून बातम्या प्रकाशित होताच काही दिवस शांत बसलेले अवैध लाकूडतोडे आता पुन्हा एकदा सक्रीय झाले असल्याने अवैध वृक्षतोड पुन्हा एकदा युध्दपातळीवर सुरू असल्याचे चित्र तालुक्यातील इवळेश्वरसह संपुर्ण तालुक्यात दिसून येत आहे.

 

माहूर तालुक्याचा बहुतांश परिसर हा घनदाट जंगल व पहाडी म्हणून प्रसिद्ध आहे..परंतू माहूर तालुक्यातील घनदाट जंगलासंबंधीची वर्तमान परिस्थिती पाहता जंगल व परिसर अत्यंत विरळ होत चालल्याचे भयान वास्तव असून वनपरिक्षेत्र अधिका-यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे अवैध लाकूड तोड्यांचा “सुवर्णकाळ” आल्याचे दिसून येत आहे. माहूर वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत असलेल्या गावात बहूमुल्य सागवानासह लिंब, अजंन, चिंच, धावडा, काटशेवरी, रोहन अशा अनेक गैरीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असून वनपरीक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षक यांच्याच मुकसंमतीने सदरचा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याने वन्यप्रेमींतून उघडपणे बोलले जात असून “अवैध वृक्षतोड जोमात अन् वनविभाग मात्र कोमात” अशीच परिस्थिती दिसून येत आहे. त्यातच दिवसाढवळ्या तोडलेल्या झाडाचे ट्रक वाहतूक पास नसतांनाही वनविभागाच्या नाक्यावरून बिनदिक्कतपणे कसे काय पास होतात..? याबाबत अनेक प्रकारच्या चर्चांना उधान आले असून वनविभागाच्या नाक्यावरून गैरी लाकूड घेवून जाणा-या प्रत्येक वाहनाला ठराविक रक्कम लावण्यात आल्याचीही  स्फोटक चर्चा जनतेतून उघडपणे बोलले जात आहे….

 

“विशेष म्हणजे वृक्षसंवर्धनासाठी दरवर्षी शासनाकडून मोठा गाजावाजा करून वृक्ष लागवड केली जाते. तर वृक्ष संवर्धनावर देखील कोट्यावधींंचा खर्च करण्यात येतो. मात्र वृक्ष तोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाकडून कोणत्याही प्रकारची उपाय योजना केली जात नाही. हे आदिवासी बहूल माहूर तालुक्याचे दुर्दैव असून माहूर रेंज मध्ये होत असलेल्या या गैरप्रकारावर उपवन संरक्षक नांदेड यांनी तातडीने पथक पाठवून तपासणी करावी. तसेच दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी निसर्गप्रेमी बांधवांसह जनतेतून होत आहे……

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close