सामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अंजनखेड येथे ‘सात तास वाचन” उपक्रमाचे आयोजन..

"अंजनखेड ग्रा. पं. कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

किनवट/माहूर

   भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभुमीवर उद्या दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ७ वा. अंजनखेड ग्रा.पं. कार्यालयाच्या वतीने नागरीक व विद्यार्थ्यांसाठी ‘सात तास वाचन’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या वाचन उपक्रमात सहभागी होवून वाचकांनी महामानवास मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रा.पं. कार्यालय अंजनखेडच्या वतीने करण्यात आले आहे..

 

माहूर तालुक्यातील मौजे अंजनखेड ग्राम पंचायतीच्या वतीने स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या वाचन उपक्रमात सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक तसेच कायदेविषयक माहितीची तब्बल १६० पुस्तके व इतरही काही विषयांची वाचनीय पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध असल्याचे ग्रा. पं. कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तर उद्या दि. १४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीउत्सवाचे औचित्य साधून सकाळी ७ ते २ वाजेपर्यत ‘सात तास वाचन’ उपक्रम राबवून ख-या अर्थाने महामानवास मानवंदना दिली जाणार आहे…

 

“विशेष म्हणजे माहूर तालुक्यातील बहुतांश ग्राम पंचायतींप्रमाणेच अंजनखेड ग्रा.पं. देखील ‘पेसा’ अंतर्गत येणारी ग्रामपंचायत असून याच पेसा अंतर्गत नागरीक व विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती मिळावी. तसेच विद्यार्थ्यांना वाचनासाठी गावात हक्काचे व आपले विचारपीठ उपलब्ध व्हावे यासाठी ग्रा.पं. कार्यालयाच्या वतीने मागील काळात पेसा अंतर्गत विविध विषयांची तब्बल १६० पुस्तके खरेदी केली होती. या पुस्तकांचा सदुपयोग होवून ते वाचकांसाठी पर्वणी ठरावी यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने अंजनखेड ग्राम पंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे. तर असाच उपक्रम तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी देखील राबवावा व नागरीकांसह विद्यार्थ्यांंच्या वाचनक्षमतेला वृध्दींगत करावे अशी अपेक्षा वाचक मंडळीकडून होत आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close