राजकिय

उद्या १२ एप्रिल रोजी ‘वंचित’ च्या डॉ. बि.डी. चव्हाण यांचा माहूर तालुक्याचा झंझावाती संपर्क दौरा….

"कार्यकर्ते उत्स्फूर्त स्वागताच्या तयारीत ; वंचित इतिहास घडविण्याच्या वाटेवर"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर
येत्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर वंचित चे लोकप्रिय उमेदवार डॉ. बि.डी. चव्हाण यांच्या किनवट -माहूर तालुक्यातील संपर्क दौरा उद्या दि. १२ एप्रिल रोजी नियोजित असून या दौ-यात माहूर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधणार असल्याची माहिती वंचितच्या वतीने कळविण्यात आली आहे..

 

 

हिंगोली लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार डॉ. बि.डी. चव्हाण यांचा उद्या दि. १२ एप्रिल रोजी माहूर तालुक्याचा संपर्क दौरा करणार असून या झंझावाती संपर्क दौ-यातून संपर्क माहूर व किनवट तालुका अक्षरश: पिंजून काढणार आहेत..तथापि राज्यातील राजकीय परिस्थितीचे अवलोकन केले असता चव्हाण यांचा हा संपर्क दौरा भन्नाट यशस्वी ठरणार असल्याचे भाकित राजकीय जाणकार मंडळीकडून वर्तवण्यात येत असून कार्यकर्ते मंडळीही आपल्या उमेदवाराच्या स्वागतासाठी जय्यत तयारीला लागल्याचे दिसून येत आहे…

 

 “विशेष म्हणजे मागील काळात प्रस्थापित राजकीय पक्षांत पडलेली फूट..! संधीसाधू राजकारणी मंडळींकडून झालेले लक्षणीय पक्षबदल..!! तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावर तोंडघशी पडलेली तत्कालीन नेतेमंडळी व त्यांची ‘समर्थक-विरोधक’ मंडळी यांचा सर्वदुर विचार केेेेेेल्यास चालू निवडणूक ही मविआ व महायुतीसाठी ‘अवघड जागचे दुखणे’ असल्याची बोलकी प्रतिक्रिया जाणकार मंडळीकडून येत आहे.. तर संपुर्ण राज्याप्रमाणेच किनवट माहूर मतदार संघातील आंबेडकरी तरूणांतही परिवर्तनाचे वारे वाहू लागल्याने यावेळी आंबेडकरी जनतेची संपुर्ण ताकद बाळासाहेबांच्याच पाठीशी लावण्याचा निर्धार आंबेडकरी जनतेने केला आहे. अशात वंचितकडून डॉ. बि.डी. चव्हाण यांच्या उमेदवारीने बहुसंख्य असलेला बंजारा समाजही “आपणोच मनक्या..!” म्हणत आहे…!!

 

एकंदरीतच स्वार्थासाठी राजकीय पक्षांचे उंबरठे झिजवण्यात धन्यता मानत असलेली संधीसाधू कार्यकर्त्यांची मोठी फळी मविआ व महायुतीच्या उमेदवारांकडून स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्याच्या तयारीत असतानाच हवा पाहून चालण्याची गती ठरविणा-या या महाठकांच्या प्रवृत्तीला यत्किंचितही संधी न देता आंबेडकरी समाजासोबतच बहुसंख्य बंजारा समाज देखील एकमताने वंचितचे गाणे गात असल्याने यावेळी वंचित मात्र ईतिहास घडवणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रत्यक्ष परिस्थितीवरून दिसून येत आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close