नोकरी संदर्भ

आगामी सणोत्सव व निवडणुकाच्या पार्श्वभुमिवर सिंदखेड पोलीसांचा ‘रूट मार्च’….

'कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन..!!'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

   आगामी सणोत्सव तसेच लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर वाई बाजारसह सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सारखणी व डुंड्रा येथे सिंदखेड पोलीसांच्या वतीने तगडे शक्तिप्रदर्शन दाखवत प्रमुख मार्गावरून ‘रूट मार्च’ काढताना नागरीकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन केले.
      चालू महिण्यातील मुस्लिम बांधवाचा सर्वोच्च उत्सव रमजान ईद बरोबरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविणारा किंबहूंना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा मुकसंदेश देणारा रूटमार्च आज सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे वाई बाजारसह सारखणी व संवेदनशिल बुथ म्हणून प्रचलित असलेल्या दुंड्रा येथे आज दि. ९ एप्रिल रोजी सकाळी 11:00 ते 13:00 वाजता च्या दरम्यान काढण्यात आला… 
  महामानवाची जयंती, धार्मिक सण व ईदच्या पार्श्वभुमीवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये तसेच येणारे उत्सव शांततेत व शासनाच्या नियमांचे इत्तंभुत व तंतोतंत पालन करत पार पाडावेत यासाठी नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करून आज दि. ९ एप्रिल रोजी सिंदखेड पोलीसांकडून करण्यात आले. यावेळी सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक गिरी, हे.पो.कॉ. गजानन कुमरे, रघुनाथ मडावी, सहायक पोलीस उपनिरिक्षक के.डी. राठोड, पो.कॉ. प्रफुल्ल पवार, राजेंद्र ठाकरे, अंकुश इंगळे..  तसेच राज्य राखीव दलातील (हिंगोली) गट क्र. 12 चे राखीव पोलीस निरिक्षक सुधाकर तुमराम यांच्यासह त्यांच्या अधिनस्त सहायक राखीव पोलीस निरिक्षक व एकूण ७८ राज्य राखीव दलातील अंमलदारांनी रूटमार्च मध्ये सहभाग घेतला….यावेळी नागरिकांनी निवडणुका व उत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन सिंदखेड पोलीसांच्या वतीने करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close