सामाजिक

वाई बाजारसह माहूर तालुक्यात विविध ठिकाणी डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी …

"ठिकठिकाणी महामानवास मानवंदना ..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

   वाई बाजार सह माहूर तालुक्यात अनेक ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षोल्हासात साजरी करण्यात आली असून महामानवाच्या जयंतीनिमित्त समाजबांधवांकडून महामानवास मानवंदना देण्यात आली..

 

 

   भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीप्रित्यर्थ वाई बाजार मोठ्या उत्साहात जयंतीउत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान येथील मुख्य चौकातील निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन तसेच दीपवंश बुध्द विहार परिसरातील धम्मध्वजाचे ध्वजारोहन करून कार्यक्रमाला सुरूवात झाल्यानंतर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पन करून समाजबांधवांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्रिसरण व पंचशिलाचे ग्रहण करण्यात आले. तद्नंतर गावातील मुख्य मार्गावरून शांततेच्या मार्गाने धम्मरँली काढण्यात येवून सायंकाळी विहार परिसरात धम्मभोजनाचा कार्यक्रम पार पडला… 
  ★ माहूर तालुक्यातील मौजे कुपटी येथील संम्यक बुद्ध विहारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान सकाळी ११ वाजता  पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण सरपंच प्रफुल भुसारे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण शुभम कुरमे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच प्रफुल भुसारे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शुभम कुरमे, शिवाजी ठाकरे, मंडळाचे अध्यक्ष माधव सावळे, उपाध्यक्ष भीमराव कवडे, रमामाता महिला मंडळाचे अध्यक्षा प्रभावती भिसे, उपाध्यक्षा दैवशाला कवडे, गटावर काम करणाऱ्या सीआरपी संध्या  कांबळे, ज्योती पवन बुरकुले, गिरीजाबाई सावळे, गणेश शेळके तसेच पत्रकार देवानंद कांबळे हे होते. यावेळी महामानवाच्या जीवन चरित्रावर कु. सावली देवानंद कांबळे, सिद्धी दिलीप कवडे, सम्यक प्रवीण कवडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चरित्रावर मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ कवडे यांनी केले…
   ★ माहूर तालुक्यातील वानोळा येथून जवळच असलेल्या पाचोंदा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये गावकऱ्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तत्पुर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. व सामूहिक त्रिसरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी वेदांत फोफसे, वैष्णवी परचाके, दिशा सुमित अडागळे या बालकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले. तसेच पत्रकार पंडित धुप्पे यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन आनंदा वाठोरे यांनी केले. तद्नंतर सायंकाळी वाजत गाजत गावातील मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्यात आली… यावेळी गावातील सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी सहकार्य केले आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close