क्राइम
कवठा बाजार येथील नदीपात्रात बुडून झालेल्या मृत्यूप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल…
"ग्रामस्थांच्या आक्रमकतेपुढे प्रशासन झुकले ; अनेक कर्मचा-यांवर कारवाईची टांगती तलवार"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
पुजेतील निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या चुलतीसह दोन पुतण्यांचा नदीपात्रात रेतीतस्करांनी खोदलेल्या खड्ड्यात बुडून झालेल्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी आर्णी पोलीस ठाण्यात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वाळू डेपो ठेकेदारासह संबंधित विभागातील कर्मचा-यांवर गुन्हा दाखल झाल्याने प्रकरणात नेमके कोण अधिकारी व कर्मचारी अडकतील ? याबाबतच्या अनेक चर्चांना आता पेव फुटले आहे…
विदर्भ व मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या मौजे कवठा बाजार येथील प्रतीक्षा प्रवीण चौधरी वय ३५ वर्ष यांच्यासह त्यांच्या दोन पुतण्या कु. अक्षरा निलेश चौधरी ११ वर्ष व कु. आराध्या निलेश चौधरी ९ वर्ष ह्या तिघींंचा काल दि. १३ रोजी सायं. साडेचार ते पाचच्या सुमारास पैनगंगा नदीपात्रात पुजेतील निर्माल्य विसर्जन करीत असताना रेतीतस्करांनी खोदलेल्या खड्ड्यात पडून दुर्दैवी नृत्यू झाला होता..त्यावेळी नदीपात्रात वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यांमुळेच ह्या तिघींचा जीव गेला असा आरोप करून संतप्त नातेवाइकांसह ग्रामस्थांनी प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत तब्बल २० तास तिनही मृतदेह नदीपात्रातच ठेवून आर्णीचे तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी नदीपात्रात मृतदेहांसह ठिय्या मांडून प्रशासनाला धारेवर धरले होते.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून आज दि. १४ रोजी दु. १:३२ वाजता नितीन नारायण चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रथम खबर क्रमांक ३४२/२०२४ कलम ३०४, ३४ भादवि. अन्वये यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पोलीस ठाण्यात वाळू डेपो ठेकेदार मोहम्मद आसिम अन्सारी रा. यवतमाळ याच्यासह संबंधित शासकीय विभागातील कर्मचा-यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास आर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक केशव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे…
“विशेष म्हणजे घटनास्थळावरील प्रत्यक्ष परिस्थितीचे अवलोकन केले असता घटनास्थळावरील नदीपात्रात रेतीमाफीयांनी खोदलेला खड्डा हा माहूर तालुक्याच्या हद्दीत येत असल्याचे प्रत्यक्ष पाहिलेल्या भौगोलिक परिस्थितीवरून दिसते. अशात आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होवून महसूल विभागाच्या आर्णी तालुक्यातील महसूली कर्मचा-यांवर कारवाईची टांगती तलवार ठेवून पोलीस प्रशासनासोबतच महसूल प्रशासनानेही सुटकेचा नि:स्वास टाकू नये… तथापि तिन निष्पाप जिवांचा बळी गेलेल्या या दुर्दैवी घटनेस आर्णी तहसील प्रशासनाबरोबरच माहूर तहसील प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीही तेवढेच जबाबदार असल्याचे परखड मत माहूर तालुक्यातील जनतेकडून व्यक्त होत असून रात्रंदिवस वाळूचा बेसुमार उपसा करण्यास मुकसंमती देवून अवैध रेतीतस्करीस चालना देणा-या माहूर तहसील कार्यालयात कार्यरत संबंधित कार्यक्षेत्रातील कर्मचारीही तेवढेच दोषी असल्याने त्यांच्यावरही कारवाही व्हावी अशी माफक अपेक्षा जनसामान्यातून व्यक्त होत आहे…

