ईतर
माहूर तालुक्यातील केरोळी फाट्यानजीक शासकीय वाळू डेपोला आजपासून सुरुवात…
"सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते फित कापून वाळू डेपोचे उद्घाटन"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
मागील अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या रेती डेपोला अखेर माहूर तालुक्यातील केरोळी फाट्यानजीक सुरुवात झाली असून आज दि. ६ जून रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते अधिकृतरित्या फित कापून वाळू डेपोचे उद्घाटन झाले. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला बहुप्रतिक्षित रेती प्रश्न निकाली निघाल्याने नागरीकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे…
शासनाच्या कल्याणकारी योजनेअंतर्गत गोरगरीब नागरिकांना स्वस्तात वाळू मिळावी यासाठी निर्माण करण्यात आलेल्या वाळू डेपोला माहूर तालुक्यातील केरोळी फाट्याजवळ सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्यासह माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांच्या उपस्थितीत आज दिनांक 6 रोजी दुपारी 3 वाजता सुरुवात करण्यात आली. माहूर शहरासह संपुर्ण तालुक्यातील गोरगरीब, नागरिक, घरकुल धारक व व्यवसायिकांना वाळू नसल्याने घर व इतर बांधकामात प्रचंड अडचणी येत होत्या. शासनाकडून नियोजित वाळू डेपोला सुरुवात होण्यासाठी उशीर लागल्याने अनेक नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न अर्धवट राहिले होते..
दरम्यान माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचे सह तालुक्यातील मान्यवरांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्याने आज रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते डेपोची सुरुवात झाल्याने नागरिकांतून शासनाचे आभार व्यक्त होत आहेत..यावेळी तहसीलदार किशोर यादव यांच्यासह नगराध्यक्ष फिरोज दोसानी, कंत्राटदार असीम भाई अन्सारी, मारुती रेकुलवार, निखिल जाधव, नगरसेवक रफिक सौदागर, सय्यद इमरान, आकाश जाधव, रामेश्वर मुसळे, प्रदीप केंद्रे, राजू पवार, इम्रान शेख, नवाब शेख, मोईज शेख, फिरोज शेख, मोहम्मद भाई, नवाब, बबलू शेख, हमीद शेख तसेच मंडळ अधिकारी विजय पाईकराव, जी.बी. कवडगावे, एस. जी. फुलारी, एस. के. साळसुंदर, तलाठी चंद्रकांत बाबर, व्ही. पी. राजुरवार, श्रीमती शीतल राऊत, राम ठाकरे, लाभार्थी राजू एडगंठवार दहेली यांचे सह घरकुलधारक लाभार्थी नागरिक उपस्थित होते…