सामाजिकक्राइम

रात्रीला वाळू वाहतूकीचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकार महोदयास बेदम मारहाण….

"बेदम मारहाण करून मोबाईलही फोडला.! ; माहूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

   पत्रकार आणि रेती वाहतुकदारांच्या मधूर संबंधातून घडलेला अजब प्रकार पुन्हा एकदा माहूर शहरात घडला असून रात्रीला वाळू वाहतूकीचे चित्रीकरण करणाऱ्या एका पत्रकार महोदयास बेदम मारहाण करताना केवळ मारहाणच नव्हे तर बेदम मारहाण करून मोबाईलही फोडूून तब्बल 23 हजाराची नुकसान केल्याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे…

     सदरची घटना दि. १२ जानेवारी २०२६ रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडलेली असून माहूर शहरासह संपुर्ण तालुक्यात वाळू वाहतुकीला अचानक उत आल्याने सदरचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.. दरम्यान माहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चित्रीकरण करून आपल्या पत्रकारीतेची ‘झलक’ दाखवण्याच्या तयारीत असलेल्या एका राष्ट्रीय स्तरावरील पत्रकार संघाच्या पत्रकार महोदयांना वाळू तस्करांनी बेदम मारहान केल्याचे सांगण्यात आले आहे..  यावेळी केवळ मारहानच नाही तर वाळू तस्करांनी मारहाण करून त्यांचा मोबाईल देखील फोडल्याची आपबीती तक्रारीत नमूद आहे… या प्रकरणी पत्रकार महोदयांनी दिलेल्या तक्रारीवरून वाळू तस्करांविरोधात माहुर पोलीसांनी विविध कलमान्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून माहूर पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत….
  तर दुसरीकडे अगदी याच घटनेप्रमाणे मागील काळात देखील अशीच एक घटना घडली होती. त्या दृष्टीने पत्रकारास मारहानीची ही दुसरी घटना असून अशा घटना नेमक्या घडतातच का..? नेमकं चुकतंय कुठे..? …. हा कळीचा मुद्दा असून रेतीवाहतुकदारांची अरेरावी वाढलीय ? का पत्रकारांचा उत्साह तेजीत आलाय..? ही संशोधनविषयक बाब असली तरी अज्ञानी पत्रकारीतेचे एक ज्वलंत उदाहरण असल्याचे वास्तव चर्चेेेेतून ऐकावयास मिळत आहे…
विशेष म्हणजे मागील अनेक महिण्यापासुन रेती वाहतूकदार व प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यांची सेटींगच जमत नसल्याने माहूर तालुक्यातील वाळू घाट अक्षरश: पोरके झाले होते. अशात केवळ कागदी घोडे नाचवताना २ कोटी ६७ लाख १४ हजार ९९१ रु. लिलाव प्रक्रीया पार पाडून महसूल विभागाने हिमालय देखील “सर” केला होता..  परंतू शासनाला मिळत असलेल्या मिळकतीचा इतरांना काय फायदा..? या ‘गहन’ विचारातून तो ‘गेम’ खोल चिखलात फसवला..  परिणामी पुन्हा कर्तव्यतत्परतेचा मुकूट बांधून २ कोटी ६७ लाख १४ हजार ९९१ रूपये किमतीचे वाळू घाट केवळ काही लाख म्हणजेच अवघ्या ४० लाख रूपयांत मंजूर करण्यात आले.. महसूल प्रशासनाची ही एक अत्यंत मोठी कामगीरी असून “जगा आणि जगू द्या” या उक्तीची तंतोतंत प्रचिती देणारी आहे…. हेच प्रमुख कारण तालुक्यातील रेती तस्करांना नवसंजिवनी देणारे ठरत असून रेती तस्कर अचानक हरकतीत आल्याने ‘प्रचंड’ आणि ‘अपरिमित’ अधिकाराप्राप्त काही पत्रकार देखील वाट्टेल ती जोखीम पत्करून अक्षरश: जिवाची दैना करवून घेत असल्याची उपहासात्मक टिका देखील माहूर वासीयांकडून केली जात आहे… 
“…..ही बाब पत्रकार आणि समाजउपयोगी पत्रकारीतेला मारक असून आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडणारी  आहे.. शिवाय समाजासाठी दिशादर्शक असलेल्या पत्रकारीतेला बदनाम करणारी देखील आहे… तथापि, पत्रकार लोकोपयोगी पत्रकारीतेसाठी शासनाने स्वत: ‘सुमोटो’ निर्णय घेवून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणा-या पत्रकारीतेसाठी काही मार्गदर्शक सुचना तसेच पत्रकार होण्यासाठी लागणारी पात्रता.. यासोबतच पत्रकाराकडे हवे असलेले लिखाण कौशल्याची चाचपणी करण्यासाठी कठोर कायदे करण्याची ख-या अर्थाने आवश्यकता निर्माण झाली असून हल्ली पत्रकारीतेचा झालेला ‘कचरा’ साफ करण्यासाठी शासनाने समोटो कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.. आणि त्यासाठीच हा शब्दप्रपंच..!! … अन्यथा शासनाने पत्रकारीतेच्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या (बि.जे. / एम.जे/ तसेच इतर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना टाळे ठोकावे…अशी उग्र भावना जाणकार व लेखणीधारक पत्रकार मंडळीकडून व्यक्त केली जात आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close