सामाजिक

श्रीक्षेत्र माहूरमध्ये कथित ‘भोंदू साम्राज्या’वर तक्रारीचा बॉम्ब..! दलित कुटुंबाच्या शेतजमीनीवर स्वयंघोषित राष्ट्रसंताचे दिखाऊ साम्राज्य..!!

"अनधिकृत आश्रम, अंधश्रद्धा आणि संशयित आर्थिक व्यवहारांच्या आरोपांनी खळबळ” 'पोलीस अधीक्षकांकडे धडक तक्रार; चौकशी करून फौजदारी कारवाईची मागणी'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)

किनवट/माहूर

   धार्मिक श्रद्धेचे प्रमुख केंद्र म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र माहूरमध्ये एका कथित स्वयंघोषित ‘राष्ट्रसंत’ म्हणून मिरवत असलेल्या एका बाबाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी तक्रार दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली असून संबंधित कथित बाबाविरोधात अनधिकृत आश्रम उभारणी, अंधश्रद्धेला खतपाणी, संशयास्पद आर्थिक व्यवहार व विविध कायद्यांच्या उल्लंघनाचे आरोप करणारी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा कायद्याचे अभ्यासक केशव भगत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह पोलीस ठाणे माहूर व संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार सादर करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केेली आहे…
तक्रारदार केशव भगत यांच्या तक्रारीनुसार, धार्मिक-आध्यात्मिकतेच्या नावाखाली कथितरित्या उभारण्यात आलेला माहूर येथील ‘तो’ आश्रम परिसरात मोठ्या प्रमाणात लोकसंपर्क, देणग्या, कथित चमत्कारवाद व श्रद्धेचा प्रभाव वापरून जनमानसांवर प्रभाव निर्माण केला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तक्रारीत पुढे असा आरोप करण्यात आला आहे की, संबंधित ठिकाणी सुरू असलेल्या कारभारामागे अनधिकृत बांधकाम, जमीन वापर नियमांचे संभाव्य उल्लंघन, शासकीय परवानग्यांबाबतचे प्रश्न आणि आर्थिक व्यवहारातील पारदर्शकतेचा अभाव यांसारख्या गंभीर बाबींची चौकशी होणे अत्यावश्यक आहे. विशेष म्हणजे, तक्रारदाराने “महाराष्ट्र नरबळी, अमानुष व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा-२०१३” अंतर्गतही बाबींची चौकशी करण्याची मागणी केली असून, आवश्यक असल्यास भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कारवाई करण्याची मागणीही केली आहे…
दरम्यान, या तक्रारीमुळे परिसरात विविध चर्चा सुरू झाल्या असून काही गंभीर प्रश्न ऐरणीवर आले असून, 
* धार्मिक आस्थेच्या नावाखाली नेमके काय सुरू आहे..?
* संबंधित आश्रमास सर्व आवश्यक शासकीय मान्यता आहेत का..?
* देणगी व आर्थिक व्यवहारांची नोंद अधिकृतरीत्या आहे का..?
* प्रशासन याप्रकरणी मौन सोडून कारवाई करणार का..? 
* अन्नदान की अज्ञात पैशांचा प्रवाह..? आश्रम की राजकीय दरबार..?
याप्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित करून केलेल्या ‘रोकठोक’ तक्रारीवर आता प्रशासन, पोलीस व संबंधित यंत्रणा आता नेमकी कोणती भुमिका घेते याकडे जनमाणसाचे लक्ष लागले आहे.
🔥 आश्रम की राजकीय शक्तिकेंद्र..? ; 
   ‘राष्ट्रसंत’ की स्वयंनिर्मित प्रतिमा..?
“विशेष म्हणजे काही बोलक्या ‘पोपटांच्या’ मदतीने स्वतःभोवती “राष्ट्रसंत” अशी प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा घणाघाती आरोप तक्रारदार केशव भगत यांनी आपल्या तक्रारीत केला असून अध्यात्माच्या नावाखाली केवळ व्यक्तीपूजेचा सोहळा दैनंदिन स्वरूपात सुरू सुरू असल्याचा आरोप केला आहे. तर संबंधित आश्रमात कथित अध्यात्मापेक्षा राजकीय नेत्यांचे आगमन, सत्कार, स्वागत समारंभ, व्यासपीठीय कार्यक्रम आणि फोटोसेशन अधिक होत असल्याची केवळ चर्चाच नव्हे तर रोजनिशी असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे “हे आध्यात्मिक केंद्र आहे की राजकीय प्रतिमा घडविण्याची प्रयोगशाळा..? असा उपरोधिक सवालही उपस्थित होत असून याबाबत स्थानिकांमध्ये अशीही चर्चा रंगत आहे की, आश्रम परिसरात समाजकार्यापेक्षा राजकीय बडेजाव, व्हीआयपी संस्कृती आणि व्यक्तीपूजेचे प्रदर्शन जास्त दिसून येते… परिणामी अन्नदानाचा पैसा नेमका कोणाचा..? जनतेला या उत्तरासोबतच देणगीदार कोण..?.. निधीचा स्रोत काय..?.. हिशोब कोणाकडे आहे..?.. आर्थिक व्यवहारांची नोंद आहे का..? या प्रश्नांची स्पष्ट, अधिकृत आणि पारदर्शक माहिती अद्याप जनतेसमोर नसल्याचा दावा निवेदनकर्त्याने केला आहे. तथापि, “जर सर्व व्यवहार स्वच्छ असतील, तर आर्थिक तपशील सार्वजनिक करण्यात अडचण काय..?” असा थेट सवाल प्रशासनाला विचारण्यात आला आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close