ईतर

डिजेच्या तालावर शासकीय वाहनातून मिरवणूक काढणाऱ्यांवर कारवाई करा ; माहूर पोलीसांत तक्रार दाखल…

"कायदा सरकारी कर्मचा-यांसाठी वेगळा अन् गोरगरीबांसाठी वेगळा काय..? कायदाप्रेमींचा संतप्त सवाल..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

     संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात पार पडलेल्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी न्यायालयाची डिजे संबंधात बंदी असतानाही माहूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने मोठ्या थाटामाटात व कर्णकर्कश आवाजात डिजे लावून चक्क शासकीय वाहनातून मिरवणूक काढल्याने कायदा सरकारी कर्मचा-यांसाठी वेगळा..अन् गोरगरीबांसाठी वेगळा का..? असा संतप्त सवाल उपस्थित करत याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात तक्रार देवून कार्यवाईची मागणी करण्यात आली आहे..

  माहूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार आकाश कांबळे यांनी माहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीनुसार येथील वन परिक्षेत्र अधिकारी यांनी शासकीय कार्यालयात गणपती बाप्पा यांचा मूर्तीची स्थापना करून दि. 18 सप्टें. रोजी शासनाच्या कामकाजाचा दिवशी शासकीय वाहनात गणपती बाप्पाची मिरवणूक काढल्याची लेखी तक्रार दिली आहे.. यावेळी डिजे लावण्यास न्यायालयाची मनाई असतांना देखील डीजेच्या कर्कश आवाजाने ध्वनीप्रदूषण केले.. त्यामुळे माहूर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे वन परिक्षेत्र अधिकारी व संबंधित वन विभाग कर्मचारी यांची चौकशी करून त्याचे विरुद्ध योग्य तो गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईची लेखी मागणी करण्यात आली आहे… दरम्यान सदरील प्रकरणी पोलिसांनी आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना कायदा वेगळा आणि गोरगरिबांना कायदा वेगळा आहे का..? असा संतप्त सवाल कायदाप्रेमी मंडळीकडून होत आहे.. 
  दरम्यान विसर्जनवेळी सायंकाळी 9 ते 9:3० वा. च्या दरम्यान वन परिक्षेत्र अधिकारी माहूर व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांनी शासकीय वाहन ज्याचा क्रमांक MH 26 R 601 या वाहनात कोणतेही शासकीय आदेश नसताना शासकीय नियमांचे उलंघन करून माहूर शहरातून विसर्जनाची भव्य मिरवणूक काढली. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे डीजे संदर्भात स्पष्ट निर्देश असतांना कर्णकर्कश आवाजात डीजे लावून कोणतीही परवानगी नसताना कायद्याचे उलंघन केले. तर सदर मिरवणुकीत वन विभागाचे अनेक कर्मचारी हे मद्यधुंद होऊन नाचत उप. वि. पो. अ. माहुर कार्यालय समोर मोठा धिंगाणा ही घातला होता. असेही तक्रारदाराने माहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे…तर सदर मिरवणुकीचे त्यांचा मोबाईल मध्ये केलेले व्हिडीओ चित्रीकरण केले व त्यांची काढलेली छायाचित्रे या सोबत सादर केली आहेत….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close