परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणी माहूरमध्ये तहसिलदारांसह पोलीस प्रशासनाला निवेदन…
'माहूर येथे घटनेचे तीव्र पडसाद उमटले...!'
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणाचे पडसाद माहूर येथेही उमटले असून येथील विविध संघटनाकडून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी परभणी घटनेचा जाहीर निषेध करत माहूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आज दिनांक 13 रोजी सकाळी 11 वाजता माहूर तहसीलचे नायब तहसीलदार कैलास जेठे यांच्यासह पोलीस प्रशासनालाही शांततेत निवेदन देण्यात आले….
या घटेनच्या निषेधासाठी माहूर नगर पंचायतचे नगरसेवक सागर महामुने, जेष्ठ पत्रकार विजय आमले, नंदकुमार जोशी, जयकुमार अडकीने, आदी पक्षाच्या नेते मंडळी आणि सामाजिक संघटनाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला..
या निवेदनावर केशव भगत, पत्रकार सिद्धार्थ तामगाडगे, मनोज कीर्तने, गोविंदराव मगरे पाटील, रेणुकादास वानखेडे,डॉ सत्यम गायकवाड, दत्ता कांबळे, विक्रांत भगत, दीपक कांबळे, मुन्ना कांबळे, कनिष्क वानखेडे, प्रवीण बर्डे, राहुल नरवाडे, शंकर कांबळे, जॉन बर्डे, राजू मगरे, अमृत जगताप, विक्रम जगताप, सचिन कांबळे, पवन लांडगे, बाळू कांबळे, रणधीर कांबळे, मनोज राऊत, राजरत्न खाडे, रवींद्र, आकाश, रामदास बर्डे, ओंकार शिंदे, देवानंद भालेराव, शेख रफिक, सईद अली, नगरसेवक प्रतिनिधी निसार कुरेशी, एम आय एम तालुका अध्यक्ष सज्जाद आजीस, फैजल खान, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत..
…..यावेळी मोठा चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.. सहायक पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण, परमेश्वर कणकावार, गेडाम, गजानन जाधव, गजानन चौधरी, सुरेश भगत आदी पोलीस स्टेशन चे अनेक पोलीस कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते…