भव्य मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आरोग्य तपासणी शिबीर संपन्न….
शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख (उबाठा) मा.ज्योतिबा खराटे यांची संकल्पना प्रत्यक्षात अवतरली...

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
श्रीक्षेत्र माहूर
शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांची संकल्पना प्रत्यक्षात अवतरली असून याच संकल्पनेतून मोफत नेत्र तपासणीसह मोती बिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन युवासेना जिल्हा प्रमुख यश खराटे यांच्या हस्ते आज माहूर येथील जुन्या नगरपंचायत इमारतीच्या प्रांगणात करण्यात आले….
आज दि. १० मार्च रोजी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत माहूर न.पं. चे उपनगराध्यक्ष नाना लाड यांच्यासह रविंद्र बेहेरे पाटील, शहर प्रमुख निरधारी जाधव, शेतकरी से.ता.प्रमुख अशोक उप्पलवाड, युवा जिल्हा समन्वयक अक्षय सातव, गटनेत्या सौ.आशा जाधव, मा.गटनेते/शहर समन्वयक बालाजी वाघमारे, युवतीसेना तालुका प्रमुख सौ.सुरेखा तळणकर, युवासेना विधानसभा प्रमुख खुशाल तामखाने, युवासेना तालुका प्रमुख अक्षय वाघ, शहर प्रमुख संदिप गोरडे, सो.मि.वि.स.प्रमुख गजानन चव्हाण, यु.श.उपप्रमुख कनिष्ठ वानखेडे, शिवसैनिक सोनु तेल्हारे, रमेश कुरसंगे यांचे सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते…
शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाध्यक्ष जोतिबा खराटे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या या शिबिरात आज दि. 10 मार्च रोजी वानोळा येथे 164 रुग्णांनी तर माहूर येथे तब्बल 274 रुग्णांनी सहभाग घेतला.. तर दि. 11 रोजी माहूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून प्रचलित असलेल्या वाई बाजार येथे याच शिबीराचे आयोजन करण्यात आले असून दि. 12 रोजी मांडवी तसेच किनवट तालुक्यात ठिकठिकाणी हेच शिबीर दि. १९ मार्च पर्यंत सुरू राहणार आहे…
त्यामुळे माहूर व किनवट या दोन्ही तालुक्यातील गरजूनी या शिबीराचा शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन ज्योतिबा दादा खराटे यामच्यासह युवा नेते यश खराटे यांनी केले आहे….

