माहूरच्या आठवडी बाजारात महिलेची हरवलेली पर्स परत करून घडविले माणूसकीचे दर्शन…
"महिला पत्रकारासह महिला पोलिस कर्मचा-यांची स्तुत्य कामगीरी"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
श्रीक्षेत्र माहूर
माहूर शहरातील आठवडी बाजारात शहरातील विश्रामगृहात स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या महिलेची पैसे व सोने असलेली पर्स बाजार करत असताना खाली पडल्याने ती महिला पत्रकार सौ. सुरेखा तळणकर यांना मिळाली त्यांनी बाजार करण्यासाठी आलेल्या महिला पोलिसांना ही बाब सांगून त्या महिलेचा बाजारातच शोध घेऊन पर्स तिला परत केल्याची घटना घडल्याने महिला पत्रकारासह महिला पोलिसांचे अभिनंदन होत आहे….
सोमवारच्या आठवडी बाजारात बाजार करत असताना येथील विश्रामगृहावर स्वयंपाकी म्हणून काम करणारी महिला धनवंता ग्यानदास कुमरे ह्यांची पर्स एका दुकानाच्या बाहेर पडली. ती पर्स महिला पत्रकार सौ. सुरेखा तळणकर यांना दिसल्याने त्यांनी पर्स हातात घेऊन पर्स उघडून बघितली असता पर्स मध्ये महिलेचे आधार कार्ड दिसून आले.. त्यावेेेळी सापडलेल्या आधार कार्डवरून त्या महिलेची बरीच शोधा शोध केली. परंतु सदरील महिला मिळून आली नाही. त्यामुळे महिला पोलीस शिपाई शिवनंदा जाधव आणि स.पो. उपनिरिक्षक सुनील गायकवाड यांच्या पत्नी सौ. कोमल गायकवाड यांना सदरील बाब सांगितल्याने त्यांनी सपोनि. शिवप्रकाश मुळे यांना सदरील घटनेची माहिती दिली.
दरम्यान तिघींनी मिळून त्या महिलेचा बाजारात शोध घेतल्याने त्या मिळून आल्या. यावेळी त्यांना जागेवरच पर्स परत करून त्यांचे साहित्य व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करायला लावली.. महिला पत्रकार सुरेखा तळणकर तसेच महिला पोलिसांनी सदरील महिलेची पर्स खात्री करून परत केल्याने सपोनि. शिवप्रकाश मुळे यांचे सह मान्यवरांनी महिला पत्रकार सुरेखा तळनकर तसेच महिला पोलीसांचे अभिनंदन केले आहे…

