माहूरातील टाकळी येथे धाडसी चोरी ; तब्बल सात लाखांचा ऐवज लंपास…..
"शेतकरी कुटुंब शेतात गेल्याने डाव साधला.. माहूर पोलीसांत गुन्हा दाखल.."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर तालुक्यातील टाकळी येथे शेतकरी कुटुंब शेतात गेल्याने डाव साधताना धाडसी घरफोडी करत तब्बल सात लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना काल रात्रीच्या वेळी घडल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी माहूर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
माहूर तालुक्यातील मौजे टाकळी येथील बाबाराव कोंडबाजी मुसळे यांंच्यासह त्यांची पत्नीही शेतकी कामानिमित्त शेतातील पिकांस पाणी देण्यासाठी गेले असताना यांच्या घरी काल दि. 12 मार्च रोजी रात्रीला दोन वाजताच्या सुमारास जबर चोरी झाली. त्यात 7 लाख 13 हजार 800 रुपये किमती सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे..
दरम्यान बाबाराव कोंडबाजी मुसळे यांच्या कथनाप्रमाणे मुसळे हे त्यांच्या परिवारासह टाकळी येथेच राहतात. त्यांना दोन मुले असुन दोघेही नौकरीनिमित्त मुंबई येथे राहतात. दि. 12/03/2025 रोजी रात्री 10.30 वा चे सुमारास ते पत्नीसह घराचे दाराला व गेटला कुलूप लावून पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. त्यावेळी सोबत बॅटरी घेण्याचे विसरल्यामुळे ते बॅटरी घेण्यासाठी परत घरी आले होते. तर घरी येवून बँटरी घेवून पुन्हा घराचा दरवाजा व गेट ला कुलूप लावून परत शेतात गेले… दरम्यान शेतातील तिळाला पाणी देेवून रात्री 02.00 वा. घरी परत आल्यानंतर घराचे गेट व मुख्य दरवाजाचे कुलूप काढलेल्या अवस्थेत दिसले.. त्यावेळी घरातील बेडरूमचे कुलूप काढून दरवाजाही उघडा केलेला दिसला. तर बेडरूम मधील लोखंडी कपाट, सींग टेबलचे दरवाजे उघडे होते. व त्यातील सामान बाहेर अस्तावेस्त पडलेले होते. तेंव्हा कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागीन्याचा बॉक्स रिकामा दिसल्याने आम्हास घरात चोरी लक्षात येताच त्यांनी घरात इतरत्र पाहणी केली असता किचन रूम मधील देवघराचे ड्राव्हर उघडे पाहून चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी पोलीसांना या घटनेची माहीती दिल्याचे फिर्यादीत सांगितले आहे…
घटनेची माहीती मिळाल्यानंतर माहूर पोलीसांनी घरी येवून प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर श्वान पथकासह अंगुलीमुद्रा पथकास पाचारण करून तपासणी करण्यात आली.. यावेळी चोरी गेलेल्या ऐवजात 7,13,800/- (सात लाख तेरा हजार आठशे रूपये) एवढा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला असून फिर्यादी बाबाराव मुसळे यांनी दिलेेेेेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे… प्रकरणाचा तपास सपोनि. शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस ऊपनिरिक्षक पालसिंग ब्राह्मण तसेच ए.एस.आय. बाबू जाधव, पो.काँ. पवन राऊत हे करीत आहेत….

