क्राइम

वडसा येथील शेतक-याचे पेरणीयंत्रासह ट्रॅक्टर पळवणा-या वडसा येथील तिघांवर गुन्हा दाखल….

"अवघ्या चोवीस तासात सिंदखेड पोलीसांकडून छडा ; ७ लक्ष ९० हजाराचा मुद्देमाल ताब्यात..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

 

किनवट/माहूर

वडसा येेेथे दि. १४ डिसेंबर च्या रात्री पेरणीयंत्रासह शेतक-याचे ट्रॅक्टर चोरून नेणा-या वडसा येथील तिघांवर सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सिंदखेड पोलीसांनी चोख कामगीरी बजावताना अवघ्या चोवीस तासात चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केल्याने सिंदखेड पोलीसांचे अभिनंदन होत आहे…

 

माहूर तालुक्यातील मौजे वडसा येथील शेतकरी शंकर दत्तात्र्यय चारोडे यांच्या घरासमोरून दि. १४ डिसेंबरच्या रात्री फिर्यादीचे सोनालिका कंपनीचे पेरणीयंत्रासह ट्रॅक्टर चोरून नेल्याची तक्रार वरील शेतक-याने सिंदखेड पोलीस ठाण्यात दिली होती. तथापि शंकर चारोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठाणेअंमलदार सहायक पोलीस उपनिरिक्षक लेखुळे यांनी गु. र. नं. 170 /2025 कलम, 303(2) भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये वडसा ता. माहूर येेेेथील तिघांवर गुन्हा दाखल केेेला होता…

 

दरम्यान गन्हा दाखल होताच पोलीस अधिक्षक नांदेड यांच्यासह अप्पर पोलीस अधिक्षक भोकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक रमेश जाधवर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत घटनास्थळापासून ते ट्रॅक्टर पळवून नेले जाऊ शकते अशा जवळपास सर्वच बाजूला उपलब्ध असलेले सिसिटिव्ही फुटेज तपासले. यात सदरचा चोरीचा ट्रॅक्टर थेट यवतमाळपर्यंत नेऊन लावलेल्या ‘त्या’ ठिकाणाहून अवघ्या चोवीस तासाच्या आत चोरीचा ७ लक्ष ९० हजार रूपयाचा मुद्देमाल सिंदखेड पोलीसांनी हस्तगत केला असून यातील तिनही आरोपी मात्र फरार झाल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे… अवघ्या चोवीस तासात चोरीचा माल हस्तगत करणा-या सिंदखेड पोलीसांच्या पथकात सपोनि. रमेश जाधवर यांच्यासह हे. पो. कॉ. दारासिंह चौहाण, पो.कॉ. संदीप वानखेडे, संजय शेंडे, व चालक राठोड यांचा समावेश होता..

 

 

“प्रकरणाचा तपास सपोनि रमेश जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार दारासिंग चौहान करीत आहेत…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close