(Bk महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
नांदेड…
आगामी जि.प. व पं.स. सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे नवीन दहा गट व पंचायत समितीच्या वीस गणांची भर पडली असून याबाबत प्रारूप प्रभाग रचनेची अधिसुचना गुरूवारी प्रसिध्द करण्यात आली आहे. तर येत्या ८ जुन पर्यंत या यावर हरकत, निवेदन, सुचना सादर करता येणार आहेत..
जिल्ह्यात यापुर्वी जिल्हा परिषदेचे ६३ गट व पंचायत समित्यांचे १२६ गण होते. आता यात जि.प.चे नवीन दहा गट व पं.स.चे वीस गणांची भर पडून आता जिल्हा परिषदेचे एकूण ७३ गट तर पंचायत समितीचे १४६ गण झाले आहेत…
यात प्रामुख्याने….
★ नांदेड तालुक्यात – धनेगाव
★ अर्धापूर – लहान
★ माहूर -लखमापूर
★ किनवट – मोहपूर
★ हिमायतनगर – सिरंजनी
★ हदगाव – कोळी
★ मुदखेड – माळकौठा
★ नायगाव – देगाव
★ कंधार – गऊळ
★ मुखेड – दापका (गुं )
…. अशा जि.प.च्या दहा गटांची व त्याअंतर्गत प्रसिध्द केलेल्या १४६ पं.स.गणांची वाढ झाली आहे…
“दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर प्रारूप प्रभाग रचनेच्या आदेशाच्या मसुद्यास कोणाची हरकत किंवा सुचना असल्यास त्याबाबतचे सकारण लेखी निवेदने/हरकती/सुचना तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे येत्या ८ जूनपर्यंत सादर कराव्यात. या तारखेनंतर आलेली निवेदने/हरकती/ सुचना आदी विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे…..

