नोकरी संदर्भ
“अवैध रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; सहाय्यक जिल्हाधिका-यांच्या आदेशाने कारवाई..”
काही दिवसाच्या ब्रेकनंतर पुन्हा कारवाया सुरू..

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर तालुक्यातील सायफळ नदीघाटाच्या पेंढावरून वाळूची चोरी करून वाहतूक करत असलेल्या एका ट्रॅक्टरला तहसीलदार कर्मचाऱ्यांनी वाई अंजनखेड रस्त्यावर पकडून कारवाई केल्याची घटना घडली असून सोबतच वडसा पेंडावरूनही ट्रॅक्टर पकडण्यात आल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे. तर काही दिवसांच्या ब्रेकनंतर कारवाया सुरू झाल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत..
माहूर तालुक्यात होत असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा बसावा या उद्देशाने सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकियेन एस. यांनी मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत तहसीलदार यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांच्या पथकाद्वारे कारवाईचे सत्र सुरू झाले असून एका महिन्या आधी सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकीएन एस. यांनी कारवाई केल्याने वाळू तस्करी बंद झाली होती. परंतु कर्मचाऱ्यांशी हात मिळवणी करून दररोज रात्रीला महिनाभरापासून वाळू तस्करी सुरू असल्याची कुणकुण सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना लागल्याने त्यांनी माहिती दिल्यानंतर तहसीलदाराकडून ही कारवाई केली गेल्याची चर्चा होत आहे…
दरम्यान माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी पत्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून ट्रॅक्टर आणि टिपर द्वारे तस्कर रेतीची वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेएन एस यांचेकडून माहूर चे तहसीलदार यांना मिळाली होती. या माहिती नुसार पाळत ठेवून तहसीलदार यांच्या सह महसूल पथकातील तलाठी हेंडगे, तलाठी राम ठाकरे, तलाठी संदीप जाधव, कोतवाल पवन पाटील, यांनी निळ्या रंगाचे ट्रॅक्टर रेती सह पकडले पकडून तहसील कार्यालयात जमा केले आहे. सोबतच वडसा पेंडावरूनही वाळूची चोरी करणाऱ्या एका ट्रॅक्टरला पकडण्यात आले असून सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकीकेएन एस यांनी माहूर तालुक्यातील वाळू तस्करांच्या मुस्क्या आवळाव्यात आणि घरकुलधारकांना पाच ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्यासह नागरिकांनाही बांधकामासाठी कमी दरात वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे…

