नोकरी संदर्भ
वाई बाजार दारूबंदीच्या पार्श्वभुमिवर सह्यांची पडताळणी सुरू…
'दारूविक्रेत्यांसह आंदोलकांचेेही 'देव' पाण्यात...!'
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
वाई बाजार येथील बहुचर्चित दारूबंदी आंदोलनातील एक प्रक्रिया असलेली सह्यांची पडताळणी प्रक्रिया राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने आज सकाळी १० वाजेपासुन सुरू झाली असून पडताळणी प्रक्रियेसाठी महिलांच्या प्रतिसादाबद्दल सध्यातरी ठोस भुमिका व्यक्त करता येत नसली तरी सदरची प्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी दारूबंदी आंदोलकांची तर अयशस्वी व्हावी यासाठी दारूविक्रेत्यांचीही धुसपुस वाढल्याची चर्चा नागरीकांमधून होत आहे..
माहूर तालुक्यातील मौजे वाई बाजार येथील संपुर्ण दारूबंदीसाठी दि. १२ डिसेंबर रोजी अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेड तसेच जिल्हाधिका-यांना लेखी निवेदन दिले होते.. तर दुसरीकडे दारूबंदीचे आंदोलन राबवताना आमच्या सह्यांचा गैरवापर झालेला असल्याचा आरोप करताना महिलांंच्या दुस-या गटानेही जिल्हाधिका-यांसह अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड यांना लेखी निवेदन देवून दिशाभुल करणा-यांविरूध्द कार्यवाही करण्याची मागणी केली होती..
त्या पार्श्वभुमिवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सह्यांची पडताळणी प्रक्रीया सकाळी दहा वाजेपासून वाई बाजार ग्राम पंचायत कार्यालयात सुरू झाली असून सुरू असलेली पडताळणी प्रक्रीया म्हणावी तेवढी सोपी नसल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असल्याने ‘दारूबंदी’ साठी मोठी कसरत करताना सर्व आव्हाणांवर मात करून यशस्वी होणारच या ठाम भुमिकेवर आंदोलक दिसून येत आहेत… तर दारूविक्रेतेेेही या संपुर्ण प्रक्रीयेवर लक्ष केंद्रीत करून अज्ञातवासात ‘खल’ करीत असल्याचे बोलले जात आहे…

एकंदरीत दारूबंदी संदर्भातील संपुर्ण प्रक्रीया ‘लंबी रेस का घोडा’ असली तरी आजच्या पडताळणी प्रक्रीयेतून आघाडी घेवून पुढील प्रक्रीयेला गवसणी घालावी यासाठी ग्रामपंचायत पुरस्कृत आंदोलकांची तर सुरू असलेली पडताळणी प्रक्रीया “फोल” ठरावी यासाठी दारूविक्रेत्यांचीही मानसिकता असल्याने दोघांनीही आपले देव पाण्यात ठेवल्याची उपहासात्मक चर्चा येथील नागरीकांमधून ऐकावयास मिळत आहे…

