ईतर

बहिनीच्या अंत्यविधीला गेलेल्या भावाचा अंत्यदर्शनापुर्वीच अपघाती मृत्यू….

'अंबोडा उड्डाणपुलावरील हृदयद्रावक घटना; संपुर्ण माहूर तालुक्यात हळहळ'

किनवट/माहूर
बहिनीच्या अंत्यविधीला गेलेल्या भावाचा अंत्यदर्शनापुर्वीच अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना काल दि. २२ रोजी महागाव तालुक्यातील अंबोडा येथे घडली असून संंपुर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे…
माहूर तालुक्यातील मौजे आष्टा येथील जेष्ठ पत्रकार भिमराव पुनवटकर (५५) यांची सख्खी बहिन सयाबाई मुनेश्वर यांचा काल दि. २२ रोजी अंबोडा ता. महागाव येथे मृत्यू झाल्याची माहिती त्यांना मिळाली होती. तेंव्हा भिमराव पुनवटकर हे मिळेल त्या खाजगी वाहनाने अंबोडा ता. महागाव येथे बहिनीच्या अंत्यविधीला निघाले होते. दरम्यान अंबोडा येथे पोहोचल्यानंतर घाईघाईने उड्डाणपुलावरील रस्ता ओलांडत असताना माहूरकडे भाविक घेवून येत असलेली एम. एच. २६ बी.सी. ०१४८ या क्रमांकाच्या बोलेरो गाडीने त्यांना जोराची धडक दिली. त्यावेळी पुनवटकर हे कित्येक फुट दुरवर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाले. 
   “विशेष म्हणजे सयाबाईच्या अंत्यविधीसाठी भिमराव यांना येण्यास विलंब होत असल्याने शेवटी बराचवेळ वाट पाहून सयाबाईची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. व भिमराव हे पुलावर उतरले नेमकी त्याचवेळी अंत्ययात्रा पुलाजवळ आली. त्यावेळी घाईघाईने अंत्ययात्रेत सामील होण्यासाठी रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला. त्यावेळी सयाबाईच्या भावाचाच अपघात झाल्याने सयाबाईची तिरडी जाग्यावरच ठेवून गावकरी मदतीसाठी धावले. दरम्यान अत्यंत भावनिक वातावरणात काल सयाबाईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून भिमराव यांच्यावर आज दि. २३ रोजी माहूर तालुक्यातील मौजे आष्टा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.. एकंदरीत या हृदयद्रावक घटनेने एकच खळबळ उडाली असून संपुर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close