क्राइम

करंजी येथे चक्क ग्राम पंचायत कार्यालयाच्या प्रांगणात भरतोय मटका बाजार….

"चक्क तंटामुक्ती कार्यालयासमोरच मटका बुकीचा टेबल; महिलांनाही लावले मटक्याचे वेड"

किनवट/माहूर
   सिंदखेड पोलीसांच्या डोळ्यात धुळफेक करत हद्दीतील करंजी येथे चक्क ग्राम पंचायत कार्यालयाच्या आवारातच मटका बुकींकडून खुलेआम मटका व्यवसाय घेण्याचा प्रताप केला जात असून करंजी येथील पुरूषांसोबतच महिलांनाही मटक्याचे वेड लावण्याचा अफलातून प्रयोग येथील मटकाकींग मंडळीकडून होत असल्याने सिंदखेड पोलीसांनी याकडे जातीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे..
  सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले करंजी येथे हा अफलातून प्रकार खुलेआम पहावयास मिळत असून पोलीसांच्या दुर्लक्षाने करंजीचे ग्राम पंचायत कार्यालय तसेच तंटामुक्ती समितीचे कार्यालय व तलाठी कार्यालय हे आजमितीस मटका बुकीचे केंद्र बनल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.. माहूर तालुक्यातील अत्यंत महत्वाचे ठिकाण असलेल्या वाई बाजारसह परिसरातील अंजनखेड, हरडफ, बोंडगव्हाण, मदनापूर, सारखणी तसेच माहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेले माहूरसह पापलवाडी, हिवळणी, आष्टा, लखमापूर व अनेक गावांत  मटका व्यवसाय जोमात आला असल्याची माहिती असतानाच अगदी ग्रामीण भाग म्हणून परिचित असलेल्या करंजी येथेही आता मटका व्यवसायाची पाळेमुळे खोलवर रूजत असल्याने या व्यवसायाला निश्चितच अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे…
   विशेष म्हणजे ‘एक का दस’ च्या लोभापाई पुर्वी फक्त पुरूष मंडळीच मटकापट्टी लावतात ही बाब सर्वश्रुत होती. परंतू करंजी येथील मटका बाजार भरवणा-या ‘त्या’ खावालाकडून “जास्तीचा रेट” देवून महिलांसाठी मटक्याच्या विविध योजना राबवत असल्याचा जणू प्रत्ययच येत आहे..   त्यामुळे  महिलामंडळीही दिवसेंदिवस या मटका खेळीच्या मोहजालात आकर्षित होताना दिसत असून कटुंबाचा गाडा सामर्थ्यपणे पेलण्यात सदा अग्रेसर असणा-या महिलांंनाही या खेळाचा मोह जडणे म्हणजे थक्क करणारी बाब असून खुलेआम सुरू असलेल्या या मटका व्यवसायाकडे पाहता.. नक्कीच सिंदखेड पोलीसांचा “आशिर्वाद”  या व्यवसायास लाभला असावा अशीच एकंदरीत परिस्थिती दिसून येत आहे…. त्यामुळे यावर आळा बसवून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व पोलीसांची विशेष पथके नेमून सुरू असलेले सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close