सामाजिक

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची ‘आष्टा’ गावाला भेट..

"दिवंगत पत्रकार भिमरावजी पुनवटकर यांच्या कुटुंबियांना एक लाखाचा दिला धनादेश ; कुटुंबियांचे केले सांत्वन.."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

माहूर/प्रतिनिधी

    बहिणीच्या अंत्यविधीला जात असताना वाटेतच अपघाती मृत्यू पावलेल्या ‘त्या’ घटनेच्या पार्श्वभुमिवर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांनी माहूर तालुक्यातील आष्टा येथे भेट घेवून दिवंगत पत्रकार यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले..

 

माहूर तालुक्यातील मौजे आष्टा येथील पत्रकार तथा रि.पा. ई गटाचे खंदे समर्थक कार्यकर्ते भिमराव पुनवटकर यांचे बहिणीच्या अंत्यविधीला जात असताना विदर्भातील आंबोडा या गावी दुर्दैवी अपघाती निधन झाले होते. आपल्या अत्यंत विश्वासू कार्यकर्त्याच्या अपघाती निधनाची माहिती मिळाल्याने केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले हे आज दि. १६ जानेवारी रोजी सकाळी १० वा. च्या दरम्यान माहूर तालुक्यातील मौजे आष्टा येथे जाऊन दिवंगत पत्रकार भिमराव पुनवटकर यांच्या परिवाराला भेट दिली.. तर कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी चे आश्वासन देवून एक लाखाचा धनदेश पुनवटकर यांच्या पत्नीकडे सुपूर्द केला…व पुनवटकर यांना श्रद्धांजली अर्पण केली..

 

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक दलितमित्र मा. विजय दादा सोनावणे, नांदेड महानगराध्यक्ष धम्मपाल धुताडे, मा. दिगंबर वाघमारे, महिंद्रा मानकर दिग्रस, समाज कल्याण विस्तार अधिकारी मोरे, समाजकल्याण अधिकारी दवणे, आष्टा गावाचे प्रतिष्टीत नागरिक बाबाराव केशवे, सोळंके सर, केशव भगत, प्रकाश गायकवाड, दीपक कांबळे, रवींद्र गायकवाड, रफिकभाई गाईड, अमोल गायकवाड, दत्ता कांबळे, धनिक शेंडे, विजय खरे, याच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते… यावेळी माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक डॉ. काशिकर तसेच सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे यांनी आपल्या फौजफाट्यासह चोख पोलीस बंदोबस्त ठेवला..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close