क्राइम

चुकीच्या पद्धतीने मृत्यूची नोंद घेतल्याप्रकरणी वाई बाजारच्या तत्कालीन ग्रामसेवकासह पाच जणांविरूध्द आदेशिका जारी… नियमित खटला नोंद करण्याचे न्यायालयाचे आदेश…

'चुकीच्या पद्धतीने मृत्यूची नोंद घेणे आले अंगलट ; प्रकरणाकडे तालुक्याचे लक्ष'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

   जन्म मृत्यू नोंद रजिस्टरवर चुकीच्या पद्धतीने मृत्यूची नोंद केल्याप्रकरणी वाई बाजारच्या तत्कालीन ग्रामविकास अधिका-यांसह सरपंच, उपसरपंच व इतर दोघांवर नियमित फौजदारी खटला नोंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून या प्रकरणात आरोपींची संख्या वाढणार असल्याचे बोलले जात असल्याने प्रकरणाकडे संबंध तालुक्याचे लक्ष वेधले आहे…

   येथील विमलबाई शंकरराव बेहेरे यांचा मृत्यू दिनांक २७ फेब्रुवारी २००९ रोजी यवतमाळ येथील वसंतरावजी नाईक शासकीय रूग्णालयात झाला होता. त्या मृत्यूसंदर्भात यवतमाळ नगर परिषदेत मृत्यूची नोंद असून मृत्यू प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले होते. परंतू त्याच मृत्यूची नोंद वाई ग्रा.पं. कार्यालयात चुकीच्या पद्धतीने झाली असल्याचा आरोप मयत विमलबाईचा मुलगा कार्तिक शंकरराव बेहेरे यांने करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती… 
 तथापि १५६(३)  अंतर्गत दि.२९ मे २०२३ रोजी इतर किरकोळ फौजदारी अर्ज ५७/२०२३ अन्वये प्रकरण माहूर न्यालयात न्यायप्रविष्ठ केले. सदर प्रकरणात वाई बाजारचे तत्कालिन ग्रामविकास अधिकारी एस. आर., गुंडमवार यांच्यासह तत्कालिन महिला सरपंच सौ. विमल राम मडावी, उपसरपंच उस्मान खान चाँद खान, शिला बजरंग नमुलवार व तंटामुक्ती अध्यक्ष कैलाश शंकरराव बेहेरे यांच्यावर संगनमताने चुकीच्या पद्धतीने मृत्यूची नोंद घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. यात न्यायालयाच्या निदर्शनात आलेल्या प्रमुख बाबींनुसार फिर्यादीने विमल बेहेरे (मयत) हिचे यवतमाळ नगर परिषदेने जारी केलेले मृत्यू प्रमाणपत्र सादर केले आहे. त्यामध्ये तिचा मृत्यू दिनांक २७/०२/२००९ रोजी वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे झाल्याचे नमुद आहे. असे असताना येथील एका महिलेने ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच यांच्याकडे मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यासाठी व तिच्या आईच्या मृत्यूची नोंद घेण्यासाठी अर्ज केला होता….
    जन्म मृत्यू नोंद अधिनियम १९६९ कलम १३ नुसार मृत्यूच्या एक वर्षानंतर मृत्यूची नोंद न्यादंडाधिकारी अथवा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशाशिवाय घेता येत नाही. असे असताना केवळ आरोपी अर्जदार हिच्या शपथपत्रावर आरोपींनी जन्म मृत्यू रजिस्टरवर बेकायदेशीर नोंद घेतली. त्यामुळे सकृदर्शनी आरोपींनी बनावट मृत्यू बनावट मृत्यूची नोंद
करुन शासकीय अभिलेखात खाडाखोड केल्याचे दिसून येेत असल्याचा निर्वाळा देताना आरोपींविरुध्द माहूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रा. र. पत्की यांनी आरोपींविरूध्द भारतीय दंड विधानाचे कलम ४२०, ४६७, ४७१, ४६८ सह कलम ३४ अंतर्गत आदेशिका जारी केली असून नियमित फौजदारी खटला नोंद करण्याचे आदेश काल दि. १९ जानेवारी २०२४ रोजी पारीत केले आहेत…
   “विशेष म्हणजे माहूर तालुक्यात सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेली वाई बाजार ग्रामपंचायत ही “भागास-महाभाग” राजकारण्यांची ग्राम पंचायत म्हणून ओळखली जाते. त्यामुळे प्रतिष्ठित असली तरी कर्मचा-यांसाठी धोकादायक असल्याच्या सर्वसामान्यांच्या भावनेतून ‘बदनाम’ आहे… त्यामुळे येथील कार्यभार सांभाळणे म्हणजे कर्मचा-यांसाठी तारेवरची कसरत किंबहूंना कायम डोकेदुखीच ठरलेली आहे.. त्यात मागील अनेक ग्रामसेवकांना येथील दुषित राजकारणाचा फटका बसल्याचाही इतिहास आहे.. अशात याही वेळी ग्रामसेवकाचा शेवटी बळी गेलाच.!! यात कोणत्याही प्रकारची ‘नवलाई’ नसली तरी… केवळ पाच वर्षांसाठी सत्तेत येवून शासकीय कर्मचा-यांचा ‘गारूडीखेळ’ करणा-या राजकारण्यांचे राजकारण व कार्यप्रणाली शासकीय कर्मचा-यांनी वेळीच ओळखणे गरजेचे असल्याची भावना तालुक्यातील जाणकार मंडळींतून व्यक्त होत आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close