सामाजिक

आयोध्येतील राम मुर्ती प्राणतिष्ठेच्या पार्श्वभुमिवर २२ जाने. रोजी वाई बाजार ग्रा.पं. कडून ‘मद्य व मांस’ विक्रीस बंदी…

"वाई बाजार ग्रामपंचायतीचा स्वागतार्ह निर्णय..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
   येत्या २२ जानेवारी रोजी होत असलेल्या आयोध्या येथील राममुर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभुमिवर वाई बाजार येथील सर्व मांस विक्रीच्या दुकानांसह मद्यविक्रीची दुकानेही बंद ठेवण्याचे लेखी पत्र ग्रा.पं. कडून काढण्यात आले असून सर्वांनी राममुर्ती प्रतिष्ठापना उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन ग्रा.पं. कडून करण्यात आले आहे..
  येथील ग्राम पंचायतीच्या लेटर हेडवर सरपंच 
सरपंच सिताराम दामा मडावी यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या पत्रानुसार येत्या २२ जानेवारी रोजी होवू घातलेल्या आयोध्या येथील राम मुर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभुमिवर ग्राम पंचायत कार्यालय वाई बाजार यांच्या कडून सर्व मटन, चिकन व मच्छी विक्रेत्यांना तसेच मांसाहारी हॉटेल धाबा, बार मालकांना कळविण्यात आले आहे…त्यानुसार श्रीक्षेत्र अयोध्या धाम येथे श्री राम मूर्ती प्राण प्रतिष्टा उत्सव सोमवार दिनांक २२/०१/२०२४ रोजी होणार असून त्यानिमित्ताने वाई बाजार येथील श्रीराम मंदिर / हनुमान मंदिर हा उत्सव साजरा होणार आहे…
   त्यामुळे गावात कोणत्याही प्रकारचे मटन, चिकन, मच्छी, चायनीज तसेच देशी, विदेशी दारू विक्री करण्यासाठी बंद करण्यात यावी व आपण आपली मटन, चिकन, मच्छी, व चायनीज दुकाने
मासाहारी हॉटेल अथवा धाबा कोणत्याही प्रकारे सुरु न ठेवता सोमवार दिनांक २२/०१/२०२४ रोजी बंद ठेवावी. तसेच सर्व विक्रेत्यांनी या सूचनेची दाखल घेेेेवून श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्टा उत्सवामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ग्रा.पं. वाई बाजार कडून करण्यात आले आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close