नोकरी संदर्भ

वाई बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर संपन्न…

"२९ लाभार्थ्यांची कुटुंबकल्याण (लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया) यशस्वी शस्त्रक्रिया"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
    प्राथमिक आरोग्य केंद्र वाई बाजार येथे आयोजित केलेल्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर आज रोजी पार पडले असून या शिबीरात तब्बल २९ लाभार्थ्यांवर कुटुंब कल्याण (लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया) शस्त्रक्रिया करण्यात आली..
   माहूर तालुक्यातील महत्वाचे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या वाई बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज  दि. २७ जाने. रोजी नांदेड जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी व वरिष्ठांंच्या मार्गदर्शनाखाली येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी जाधव यांच्यासह माहूर पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी आर.एस. गावंडे (पाटील), आरोग्य सहाय्यक डी.के.जोशी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी लक्ष्मण जोगपेठे, औषध निर्माण अधिकारी सुरेश ढगे, आरोग्य सहाय्यक डी.जे.राठोड तसेच आरोग्य कर्मचा-यांच्या पुढाकाराने येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया) शिबिर आयोजित करण्यात आले होते.  या शिबिरात एकूण २९ लाभार्थ्यावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली असून ही शस्त्रक्रिया किनवट येथील साने गुरुजी रुग्णालयाचे प्रसिद्ध सर्जन डॉ.अशोक बेलखोडे यांनी केली. 
     सदरचे शिबिर यशस्वी होण्याकरीता समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव लहाने, डॉ.स्वीटी भोयर, डॉ.सपना इंगोले, डॉ.पुंडलिक भुरके, डॉ.व्यंकटेश डांगे, आरोग्य कर्मचारी बालाजी मोरे, नरेंद्र ठाकरे, विठ्ठल कोतापल्ले संतोष घोगरे, सुमित सूर्यवंशी, कनिष्ठ लिपिक गिरीश कुलकर्णी, वाहन चालक गणेश कोरे, आरोग्य सेविका श्रीमती आडे, श्रीमती शीतल माळोदे, श्रीमती वाघमारे, श्रीमती नैताम, श्रीमती चरपिलवार, श्रीमती वाडेकर, श्रीमती राठोड, श्रीमती भगत, श्रीमती भारती नागपुरे, परिचर श्रीमती बेद्रे, श्री.अंनगुले, श्री योगेश कानगुले तसेच आशा वर्कर व मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close