शैक्षणिक

वाई बाजार येथील जि.प. शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्य ‘वार्षिक स्नेहसंमेलन’ सोहळा दिमाखात संपन्न…!

"चिमुकल्यांचे अप्रतिम 'नृत्यदर्शन' प्रेक्षकांसाठी ठरली मेजवानी..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

   प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वाई बाजार जि.प. शाळेत सांस्कृतिक तथा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहपुर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला असून चिमुकल्यांची नृत्य कलाकृती रसिक प्रेक्षकांसाठी अक्षरश: मेजवानी ठरली…
     केवळ परिसरातच नव्हे तर संपुर्ण तालुक्यातील शिक्षणक्षेत्रात अग्रेसर व सरस असलेल्या वाई बाजार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत काल दि.२७ जाने.२०२४ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वार्षिक स्नेहसंमेलन सोहला पार पडला…
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील सरपंच सिताराम दामा मडावी तर उपसरपंच हाजी उस्मानखान पठाण यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमन पठाण, ग्रा.पं. सदस्य फिरोजखान पठाण, शितल शिंदे, पोलीस पाटील आशा बळीराम मोरे तसेच अनेक मान्यवर व पत्रकार प्रमुख पाहूणे होते. तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून स्नेहसंमेलानाची सुरूवात करण्यात आल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक व शिक्षिकांच्या काटेकोर नियोजनातून वार्षिक स्नेहसंमेलन तथा सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. दरम्यान अगदी पहिली ते सातवीपर्यंतच्या  विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या अलौकिक कलागुणांचे प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली. तर सहशिक्षक मुनेश्वर थोरात व बंडू ईश्वरकर यांच्या सुत्रसंचालनातील जुगलबंदीही पहावयास मिळाली.. 
   या स्नेहसंमेलन सोहळ्याचेे सुत्रसंचालन अर्थातच मुनेश्वर थोरात तसेच बंडू ईश्वरकर यांनी तर आभार शाळेचे मुख्याध्यापक डि.बी. शिंदे यांनी मानले… कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनात मुख्याध्यापक डि.बी.शिंदे यांच्यासह शाळेतील शिक्षक बंडू ईश्वरकर, रोहीदास जाधव, सुशिल गावंडे, उमेश डाखोरे, हन्नानपाशा अब्दुल अजीज बरोटे,  मुनेश्वर थोरात, किशोर कांबळे, शिक्षिका रूपाली आरेकर, प्राजक्ता लांडे, जोत्सना केशवे, गिता कुमरे तसेच मामा म्हणून प्रचलित असलेले शिवाजी तलांडे व दशरथ किनाके यांनी परिश्रम घेतले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close