क्राइम

नळ सोडताना उठवले का नाही.? म्हणत आदिवासी महिला सरपंचास जातीवाचक शिवीगाळ व चपलाने मारहाण..

"माहूर पोलीसांत गुन्हा दाखल. ; माहूर तालुक्यातील मेंडकी येथील घटना..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

  नळ सोडताना उठवले का नाही म्हणत सरपंचपतीस मारहाण करण्याबरोबरच महिला सरपंचास जातीवाचक शिवीगाळ केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील मेंडकी येथे घडली असून याप्रकरणी महिला सरपंचाने दिलेल्या फिर्यादीवरून माहूर पोलीसांत अनु. जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
  माहूर तालुक्यातील मौजे मेंडकी येथील महिला सरपंच सौ. आशा किसन हातमोडे वय 26 वर्ष धंदा मजुरी जात भिल्ल आदीवासी रा. मेंडकी ता. माहूर यांनी काल दि. २७ जाने. रोजी माहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मौजे मेंडकी येथे त्या सरपंच पदावर 06 महिण्यापसुन आहेत. तर सरपंच असल्याने गावातील नळ योजनेची जबाबदारी माझेवर असुन नळ योजनेचे पाणी सोडण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत सेवक म्हणुन वसंता जानू चव्हान यास नळ सोडण्यासाठी ठेवण्यात आले आहे.. तथापि, प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी 07:30 वा. झेंडा वंदन चा कार्यक्रम असल्याने दि. २५ रोजी रात्री पाणी सोडतो असे मला सेवक याने सांगून नळ रात्री सोडतो परंतू रात्रीची वेळ असल्याने सोबत एक एक माणूस पाहीजे असल्याचे तो म्हणाल्याने माझे पती किसन हातमोडे यास त्याचे सोबत पाठवुन रात्री 00:00 पासुन ते रात्री 03:00 वा. जे पर्यंत पाणी गावात सोडण्यात आले…
 दिनांक 26 जाने. 2024 रोजी सकाळी 07:30 वा ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजा करून घराकडे जात असतांना अंदाजे 08:00 वा. चे सुमारास गावातील किशोर भगवान राठोड यांचे घराजवळ गेलो असता किशोर भगवान राठोड हा मला म्हणाला की पाणी सोडतांना मला उठवले का नाही.? या कारणावरून माझेशी वाद केला व मला म्हणाला की आदीवासी गरीबांची औकात आहे का ध्वजारोहन करण्याची..? असे जातीवाचक शिवीगाळ करून माझ्या नव-यास चपलीने मारहाण केले मी सोडण्यास गेली असता मला पण चपला व थापडबुक्याने माराहन केली त्याच वेळी सोबत संजय भगवान राठोड याने पन मला व माझ्या पतीली म्हणाले की आदीवासी हो तुम्हची औकात आहे का झेंडा फडकवण्याची अशी जातीवाचक शिवीगाळ केली…
आदी कारणावरून सरपंच सौ. आशा किसन हातमोडे यांनी माहूर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या जबाबावरून गु.र.नं. ९/२०२४ कलम, ३२३, ५०४ भादवी. तसेच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ च्या कलम ३ (१) (r) अन्वये यातील संशयित आरोपी किशोर भगवान राठोड व संजय भगवान राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close