शैक्षणिक

‘सुभद्राबाई केशवे इंग्लिश मीडियम स्कूल’ वाई बाजार येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा…

"चिमुकल्यांचे भन्नाट नृत्यप्रदर्शन ; उपस्थितांची मने जिंकली..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

  येथील सुभद्राबाई केशवे इंग्लिश मीडियम स्कूल वाई बाजार येथे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमिवर वार्षिक स्नेहसंमेलन तथा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या हर्षोल्हासात पार पडला असून स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी सादर केेेेेेलेल्या भन्नाट नृत्यप्रदर्शनात अक्षरश: उपस्थितांची मने जिंकल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे…
  ७५ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वाई बाजार येथील सुभद्राबाई केशवे इंग्लिश मिडियम स्कूल येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे डॉ. निरंजन केशवे यांच्यासह शिवसेनेचे (शिंदे गट) तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक, वाई बाजारचे सरपंच सिताराम दामा मडावी, उपसरपंच हाजी उस्मान खान चाँद खान, युवा उद्योजक आतिश गेंटलवार व पालक माता पित्यांसह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत येथील शाळा परिसरात या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व कलामंचाचे उद्घाटन झाल्यानंतर शाळा प्रशासनाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले… 
   तद्नंतर चिमुकल्यांच्या नृत्यप्रदर्शनास सुरूवात करण्यात आली. दरम्यान स्वत:चे नावही न सांगता येत असलेल्या चिमुकल्यांंनी अनेक बहारदार गितांवर आपल्या भन्नाट कलागुणांचे प्रदर्शन करताना अप्रतिम नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली.. तर अनेक चुटकुले व छोट्या नाटिकांतून भौतिक व सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडविले..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोला सलाम यांनी, बहारदार सुत्रसंचालन शिक्षिका भाग्यश्री टनमने व साक्षी नाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य ए.पी. कंधारे, डाखोरे सर, नाळे सर, प्रियंका गोपने, प्रजापती थोरात, बेहेरे मँडम, टनमने मँडम, गावंडे मँडम, दळवे मँडम यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीमती ठमके, श्रीमती नमुलवार, विशाल पारधे, स्वप्नील सलाम व अंकुश टनमने आदींनी परिश्रम घेतले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close